You Tube ने नियमांमध्ये केले बदल ; आता ५०० सबस्क्रायबर्स असणाऱ्या चॅनेल्सला ………

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ जुन । सध्याचा काळ हा सोशल मीडियाचा काळ आहे. प्रत्येक जण सोशल मीडियाचा वाप[आर करत असतो. तसेच काही प्लॅटफॉर्मवरून आपल्याला पैसे देखील कमवता येतात. यामध्ये You Tube हे असे एक प्लॅटफॉर्म आहे जिथे आपण आपले व्हिडीओ , शॉर्ट्स अपलोड करू शकतो. तिथे अनेक चॅनेल्स आपल्याला पाहायला मिळतात. काहींचे सबस्क्रायबर्स मोठ्या प्रमाणात असतात तर नवीनच सुरूवात असलेले अधिक सबस्क्रायबर्स नसतात. मात्र आता कमी सब्सक्रायबर्स असणाऱ्या चॅनेल्ससाठी आनंदाची बातमी आहे.

युट्युबने आपल्या नियमांमध्ये बदल केल्यामुळे कमी सबस्क्रायबर्स किंवा कमी फॉलोअर्स असणाऱ्या चॅनेल्सना फायदा होणार आहे. लोकप्रिय व्हिडीओ शेअरिंग आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म YouTube ने जाहीर केले आहे की आता ५०० सबस्क्रायबर्स असणारे सदस्य देखील आता पैसे कमवण्यासाठी पात्र असणार आहेत. कारण युट्युबने १००० सबस्क्रायबर्स असण्याची मर्यादा ५०० इतकी केली आहे. युट्युबने पैसे कमवण्यासाठी आवश्यक असलेल्या पात्रतेमध्ये बदल केला आहे आणि लहान क्रिएस्टर्सना म्हणजेच ज्यांचे सबस्क्रायबर्स जास्त नसतील अशा चॅनेल्सला प्लॅटफॉर्मवर टिकून राहण्यासाठी व पैसे कमवण्याची संधी मिळावी यासाठी प्लॅटफॉर्मने आपल्या धोरणांमध्ये बदल केला आहे. याबाबतचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *