महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ जुन । Gold-Silver Price Today: १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ५९,३५० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ५८,८९० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार चांदी ७२,३०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७१,५६० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,४०४ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,३५० रुपये असेल. मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत ५४,४०४ प्रति १० ग्रॅम आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५९,३५० प्रति १० ग्रॅम आहे. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,४०४ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,३५० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,४०४ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,३५० रुपये आहे.