पुणे आकाशवाणीच्या बातम्या सुरूच राहणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ जुन । आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या बातम्यांचे युनिट छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्याच्या निर्णयाला केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी स्थगिती दिली आहे.

खासदार प्रकाश जावडेकर यांनी ठाकूर यांच्याशी संपर्क साधून यासंदर्भात चर्चा केली. प्रसार भारतीचे अपूर्व चंद्र आणि मुख्य कार्यकारी अधिकारी द्विवेदी यांच्याशीही जावडेकर यांची चर्चा झाली आहे. पुणे आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या बातम्यांचे युनिट छत्रपती संभाजीनगरला हलविण्याचा निर्णय रद्द करावा, यासंदर्भात जावडेकर यांनी चर्चा केली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *