Asia Cup 2023 : आशिया चषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर, पाकिस्तानात फक्त 4 सामने, उर्वरित स्पर्धा श्रीलंकेत होणार

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ जुन । आशिया चषकाबाबत सुरू असलेल्या अटकळांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. आशिया कप खेळवण्यात येणार असून त्याचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने ही स्पर्धा दोन देशांमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी आशिया चषक पाकिस्तान आणि श्रीलंकेत होणार आहे. स्पर्धेला 31 ऑगस्टला सुरुवात होणार असून अंतिम सामना 17 सप्टेंबरला होणार आहे. आशिया चषक हा हायब्रीड मॉडेल अंतर्गत खेळवला जाणार असून या अंतर्गत पाकिस्तानमध्ये फक्त 4 सामने खेळवले जाणार आहेत. श्रीलंकेत 9 सामने होणार आहेत.

यावेळी ही स्पर्धा दोन गटात होणार असल्याची माहिती आशियाई क्रिकेट परिषदेने दिली. दोन्ही गटातील 2-2 संघ सुपर-4 टप्प्यात पोहोचतील. सुपर-4 फेरीतील अव्वल 2 संघ अंतिम फेरीत खेळतील.

यावेळी आशिया चषक एकदिवसीय फॉर्मेटमध्ये खेळवला जाणार आहे. विश्वचषक स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने आशिया चषक ही सर्व आशियाई संघांसाठी अत्यंत महत्त्वाची स्पर्धा आहे. या स्पर्धेत भारतासह पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळचे संघही खेळणार आहेत.


आम्ही तुम्हाला सांगतो की पाकिस्तान पहिल्या आशिया चषकाचे यजमान होते, पण बीसीसीआयने टीम इंडियाला तिथे पाठवण्यास नकार दिला होता. यानंतर पीसीबीनेही आडमुठी भूमिका घेत ही स्पर्धा पाकिस्तानातच आयोजित करण्याचा आग्रह धरला. पण अखेर बीसीसीआय आणि इतर क्रिकेट बोर्डांच्या दबावापुढे पीसीबीला नमते घ्यावे लागले. आता या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे, असे म्हणायला हवे, पण त्यापेक्षा दुप्पट सामने श्रीलंकेत होणार आहेत, ही त्यांच्यासाठी धक्कादायक बाब आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *