Adipurush ऑनलाइन लीक! रिलीजच्याच दिवशी ‘या’ वेबसाइटवर HD प्रिंटमध्ये अनेकांनी पाहिला चित्रपट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ जुन । ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष हा चित्रपट अखेर आज (16 जून 2023) प्रेक्षकांच्या भेटील आला आहे. रामायणाच्या कथेवर आधारित या चित्रपटात अभिनेता प्रभास, क्रिती सेनॉन आणि सैफ अली खान याने लंकेश आणि सनी सिंहने लक्ष्मणाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिलेले प्रेक्षक त्यातील काही भूमिका पाहून थक्क झाले आहेत. देशभरातील बहुतांश चित्रपटगृहे सध्या हाऊसफुल्ल आहेत. परंतु रिलीजच्या पहिल्याच दिवशी आदिपुरुश हा चित्रपट ऑनलाईन लिक झाला आहे.

आदिपुरुष हा चित्रपट आज (16 जून 2023) ला सिनेमागृहा प्रदर्शित झाला आहे. पण रिलीजच्या पहिल्या दिवशी हा सिनेमा ऑमलाइन लीक झाला आहे. हा सिनेमा HD प्रींटमध्ये Filmyzilla, 123movies, Filmywap, Onlinemoviewatches, 123movierulz, Telegram, Tamilrockers यांसारख्या वेबसाइटवर प्रेक्षक पाहू शकतात. तसेच हा चित्रपट 1080p, 720p, 480p, 360p, 240p, आणि HD मध्ये 123movies, 123movierulz, Filmyzilla, Onlinemoviewatches, Filmywap आणि Tamilrockers सारख्या काही पोर्टलवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे या सिनेमाच्या कमाईवर चांगलाच परिणाम होणार आहे.

ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचा पहिला शो पाहिल्यानंतर ट्विटरवर प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट त्यांना कसा वाटला, याविषयी प्रेक्षक ट्विट करत आहे. सुमारे 500 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वात महागडा चित्रपट मानला जातो. पहिल्या शोनंतर या चित्रपटाला सोशल मीडियावर संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. राघवच्या भूमिकेतील प्रभासच्या अभिनयाला चाहत्यांनी दाद दिली असून पार्श्वसंगीताचेही अनेकांनी कौतुक केले. काहींनी ओम राऊतच्या पडद्यावरील कमकुवत व्हीएफएक्स आणि सैफ अली खानच्या भूमिकेवर टीका केली.

या चित्रपटाचा टीझर गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता. केवळ WhFX आणि कलाकारांच्या लूकमुळे नकारात्मक प्रतिक्रियांचा पाऊस पडला. ‘आदिपुरुष’चा टीझर रिलीज झाल्यानंतर त्यातील कलाकारांचे लूक पाहून नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. टीझरमधील रावणाच्या लूकवर नेटिझन्सनी आक्षेप घेऊन सैफ अली खानच्या दाढीची तुलना नेटकऱ्यांनी मुघलांशी केली होती. हा वाद इतका वाढला की निर्मात्यांना रिलीजची तारीख पुढे ढकलावी लागली.

पठाणचा विक्रम मोडणार का?
मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, ‘आदिपुरुष’ चित्रपट रिलीजच्या पहिल्याच दिवशी 100-120 कोटींचा व्यवसाय करू शकतो. या चित्रपटाने आतापर्यंत 85 कोटींची कमाई केली आहे. प्रभासचा हा चित्रपट शाहरुक खानच्या पठाण चित्रपटाचा विक्रम मोडू शकतो, अशी अपेक्षा चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *