Raigad Fort: रायगड किल्ल्यावर जाणारा मार्ग 31 ऑगस्टपर्यंत बंद

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ जुन । शिवप्रेमींसाठी रायगड संदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. रायगड किल्ल्यावर जाणारा मार्ग 31 ऑगस्टपर्यंत बंद करण्यात आला आहे. त्यामुळं शिवप्रेमी आणि पर्यटक नाराज झाले आहेत. (raigad fort closed till 31st august police administration took this big decision)

रायगड किल्ल्यावर जाणारी पायवाट बंद करण्यात आली आहे. पायरी मार्गावर सतत दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्यामुळे पोलीस प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रायगड किल्ल्याचा पायरी मार्ग 31 ऑगस्टपर्यंत पर्यटक आणि शिवप्रेमींसाठी बंद राहणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून रायगड किल्ल्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर सतत दरड कोसळण्याच्या घटना घडत आहे. त्यामुळे भविष्यात कोणतीही मोठी दुर्घटना होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने हा मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पण काहीसा दिलासा देणाराही निर्णय पोलिसांनी घेतला आहे.

रोप वेची सुविधा सुरु राहणार
रायगड किल्ल्यावर जाणाऱ्या मुख्य रस्त्यापासून ते महादरवाजापर्यंतच्या पायरी मार्गावर सतत दरड कोसळण्याच्या दुर्घटना घडत आहेत. त्यामुळे आता किल्ल्याच्या दिशेने जाणारा पायी मार्गच बंद राहणार आहे. (Latest Marathi News)

रायगड किल्ल्यावर जाणारा पायरी मार्ग बंद करण्यात आला असला तरी किल्ल्यावर जाण्यासाठी रोप वेची सुविधा सुरु राहणार आहे. त्यामुळे पर्यटक आणि शिवप्रेमींना काहीसा दिलासा मिळाला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *