महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ जुन । गेल्या महिन्यात ६२ हजार १०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचलेले सोन्याचे भाव आता ५९ हजार ७०० रुपये प्रति तोळ्यावर आले आहेत. सव्वा महिन्यात यामध्ये तब्बल दोन हजार ४०० रुपयांनी घसरण झाली. चांदीचे भाव पाहिले तर त्यातही पाच हजार रुपयांची घसरण होऊन ती ७८ हजार रुपयांवरून ७३ हजार रुपये प्रति किलोवर आली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवसापासून सातत्याने सोने-चांदीच्या भावात वाढ होत जाऊन नवनवीन उच्चांक गाठले जात होते. त्यादरम्यान ५९ हजारांपासून ६२ हजारांचा टप्पा सोन्याने ओलांडला.
चांदीची घसरण
₹७८,००० – २० मे २०२३
₹७५,५०० – ८ जून २०२३
₹७४,३०० – ९ जून २०२३
₹७३,३०० – १४ जून २०२३