Clothes Drying Tips : आता पावसाळ्यात कपडे सुकण्याचं नो टेन्शन; या टिप्सने काम होईल सोप्प

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ जुन । पावसाळा सुरु झाला की सर्व महिलांना कपडे सुकवण्याचं मोठं टेन्शन होतं. कपडे नेमके कसे सुकवावेत काय करावं समजत नाही. घरात सगळीकडे ओले कपडे लटकवून ठेवावे लागतता. त्यामुळे आज या बातमीतून कपडे सुकवण्याच्या काही सोप्प्या ट्रीक जाणून घेऊ.  


फॅनचा वापर करा
पावसाळ्यात कपडे सुकवण्यासाठी तुम्ही घरातल्या फॅनचा वापर करु शकता. कपडे सुकवण्याआधी ते व्यवस्थित पिळून घ्यावेत. त्यातील शक्य तितके पाणी काढून टाकल्यावर सुटसुटीत एका दोरीवर टाकावेत. झटपट कपडे वाळावेत यासाठी तुम्ही घरातील सर्व पंखे सुरु करु शकता. त्यामुळे कपडे लवकर वाळतील.

वॉशिंग मशीन
आजकाल प्रत्येकाच्या घरात कपडे धुन्यासाठी वॉशिंग मशीन उपलब्ध आहे. त्यामुळे कपडे धुतल्यावर ते वॉशिंग मशीनमध्ये आवश्य टाका. वॉशिंग मशीनच्या ड्रायर बॉक्समध्ये कपडे टाकल्यावर ते चांगले पिळून निघतात. कपड्यांमधील जास्तीत जास्त पाणी मशीन काढून टाकते. त्यानंतर कपड्यांवर उन पडले नाही तरी कपडे फक्त हवेवर छान सुकतात.

हँगल आणि क्लोथ स्टँडचा वापर करा
कपडे सुकवण्यासाठी तुम्ही क्लोथ स्टँड आणि हँगलचा वारप करु शकता. दोरीवर कपडे टाकल्यावर ते पूर्ण पसरले जात नाहीत आणि मोकळे होत नाहीत. कपड्याची एक बाजू सुकते आणि कपडे आतून ओलेच राहतात. त्यामुळे सर्व बाजूंनी कपडे सुकवून घेण्यासाठी तुम्ही स्टँड किंवा हँगल्सचा वापर करु शकता.

इस्त्रीचा वापर
बऱ्याच वेळा पावसाळ्यात हवेत गारवा असल्याने कपडे (Cloth) गार पडतात. कपडे सुकलेले असले तरी गार पडल्याने ते ओलेच आहेत की काय? असं वाटतं. मात्र अशा वेळी तुम्ही इस्त्रीचा वापर करु शकता. त्याने कपड्यांना उब येते. तसेच कपडे काही प्रमाणात ओले राहिले असतील तर ते देखील सुकून निघतात.

हेअर ड्रायर
घरात मुली असल्या की हेअर ड्रायर असणारच. केस सुकवण्यासाठी सर्वच मुली हेअरड्रायरचा वापर करतात. या हेअर ड्रायरचा वापर तुम्ही केस सुकवण्यासाठी देखील करु शकता. हेअर ड्रायरमधून गरम आणि थंड अशा दोन्ही पद्धतीची वाफ, हवा बाहेर येते. त्यामुळे तुमच्या सोईने तुम्ही या हेअर ड्रायरचा वापर कपडे सुकवण्यासाठी करु शकता.

पावसाळ्यात सतत पाऊस पडत असल्यास कपडे सुकवण्याची मोठी अडचण होते. अर्धवट सुकलेले ओले कपडे घातल्याने त्वचेवर त्याचा परिणाम होतो. तसेच कपड्यांचा आंबट वास देखील येतो. त्यामुळे या काही सोप्या ट्रिक्स वापरून तुम्ही कपडे सुकवू शकता.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *