साडेबारा टक्क्यांच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांविरोधात निषेध घोषणाबाजीद्वारे आंदोलन करण्याचा इशारा देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यास निगडी पोलिसांनी दिवसभर घेतले ताब्यात

Spread the love

Loading

प्रत्येक वेळी पोलिस मुस्कटदाबी करताहेत, सचिन काळभोर यांनी व्यक्त केली खंत

पिंपरीः
पीएमआरडीएने निगडी येथील साडेबारा टक्के परतावा लवकरात लवकर द्यावा, या मागणीसाठी निगडी येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर गेल्या कित्येक दिवसांपासून संविधानिक पद्धतीने पीएमआरडीए प्रशासनाविरोधात निषेध आंदोलन करत आहेत. मात्र त्याला प्रतिसाद मिळत नसल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात घोषणाबाजी करून निषेध आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. या पार्श्वभूमिवर निगडी पोलिसांनी सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांना शुक्रवारी (दि. 16) रोजी दिवसभर ताब्यात घेतले.

सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी आपण साडेबारा टक्के परतावा मिळावा यासाठी आंदोलन करणार असल्याचा निर्वाणीचा इशारा मुख्यमंत्री कार्यालयास इमेलद्वारे दिला होता. महत्त्वाची बाब म्हणजे, पिंपरी-चिंचवड शहरातील शेतकरी बांधवांना साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा मिळण्यासाठी गेल्या ४६ वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा देण्यात यावा म्हणून गेल्या अधिवेशनात साडे बारा टक्के जमीन भूखंड प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्या संदर्भात 15 दिवसांत अंमलबजावणी करण्यात येईल, अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत केली होती. तसेच आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील शेतकरी बांधवांना साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा देण्यात यावा म्हणून नागपूर येथील अधिवेशनामध्ये हा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

राज्य सरकार पिंपरी चिंचवड शहरातील शेतकरी बांधवांना साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा देण्यासाठी फक्त आश्वासन देत आहे. कृती करत नाही तसेच १९७२ ते १९८६ व १९७८ ह्या कालावधीत १०६ शेतकरी बांधवांना साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा देणे बाकी असून, ४८ शेतकरी बांधवांचे साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा संदर्भात न्यायालय दावे प्रलंबित आहेत. तर ३५ वारसा हक्कधारकांचे अपूर्ण कागदपत्रांअभावी प्रलंबित आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वेळोवेळी साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा संदर्भात निवेदन देण्यात आले. तसेच आंदोलन करण्यात आले, मोर्चा काढण्यात आला. तरीही साडेबारा टक्के जमीन भूखंड परतावा प्रश्न रेंगाळत पडलेला आहे. एकमेव पिंपरी-चिंचवड शहरातील आमदार महेश लांडगे यांनीच साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा प्रश्न सोडविण्यासाठी अधिवेशनात आवाज उठवला होता. त्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत पिंपरी चिंचवड शहरातील शेतकरी बांधवांना वैठीस धरुन ठेवले आहे. याविरोधात वारंवार आवाज उठवूनही सुस्तावलेले प्रशासन साडेबारा टक्क्यांचा प्रश्न सोडवत नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाविरोधात शुक्रवारी घोषणाबाजी करून निषेध नोंदविण्याचा इशारा सामाजि कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी दिला होता. मात्र कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून, सचिन कळभोर यांना निगडी पोलिसांनी सकाळीच ताब्यात घेतले. संपूर्ण दिवसभर त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *