महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ जुन । पुण्यातील गंगाधाम चौकाच्या परिसरात असलेल्या गोदामाला आज पहाटे भीषण आग लागली. आगीने रौद्ररुप धारण केल्याने अवघ्या काही वेळामध्ये भडका उडाला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याकडून आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू आहे.
या गोदामांना लागली आग
गंगाधाम चौकाच्या परिसरात विविध प्रकाराच्या मालाची गोदाम आहेत. सदर आग ही सिमेंट व बिस्किट मालाच्या गोदामाला लागल्याची प्राथमिक माहिती आहे.
वस्तीजवळ भीषण आग
गंगाधाम चौकाच्या आसपास वस्ती आहे. त्यामुळे गोडाऊला आग लागल्याने या भागातील नागरिकांमध्ये गोंधळ उडाला. दरम्यान, किती नुकसान झाले अद्याप कळालेले नाही. आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
लग्नाचा मंडप गोडाऊनमध्ये असल्याने आग लागली
लग्नाचा मंडप देखील गोडाऊनमध्ये असल्याने कापडाने चांगलाच पेट घेतला. त्यामुळे आगीने रौद्ररुप धारण केले. त्यामुळे आगीचे लोट मोठ्या प्रमाणात दिसून येत होते. पुण्यातील गंगाधाम चौकालगत चिंतामणी कॉम्पलेक्समधील गोडाऊनमध्ये ही आग लागल्याची प्राथमिक आहे. या ठिकाणी सुमारे विविध साहित्यांचे वीस गोडाऊन आहेत. अर्धातासानंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. सकाळी आठ वाजेच्या सुमारास आग लागली. होती