जगन्नाथ यात्रा 20 जूनपासून, 25 लाख भाविक येणार ; उन्हापासून भाविकांच्या बचावासाठी यात्रा मार्गावर पाण्याचे स्प्रिंकलर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ जुन । पुरीमध्ये जगन्नाथ यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात आहे. याची सुरुवात सोमवारी भगवान जगन्नाथाच्या नेत्रोत्सवाच्या वैदिक मंत्रोच्चाराने होणार आहे. यावेळी जगन्नाथ, बलभद्र आणि देवी सुभद्रा यांचे अलौकिक दर्शन होणार आहे.

मंगळवारी भगवान जगन्नाथ रथावर स्वार होऊन गुंडीचा मंदिराकडे प्रस्थान करतील. या दरम्यान 25 लाख लोक येण्याची प्रशासनाला अपेक्षा आहे. त्यामुळे 170 प्लाटून पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. संपूर्ण शहर 14 झोन, 29 सेक्टरमध्ये विभागले गेले आहे.

जगन्नाथ मंदिरातील देवतांच्या ‘नबजौबन’ दर्शनाला तीन तास परवानगी असेल. भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा सोमवारी अनसार घरामध्ये (आजारी खोली) 14 दिवस घालवल्यानंतर ‘नबजौबन बेशा’ (तरुण पोशाख) मध्ये दिसणार आहेत. पहिल्या रविवारी देवतांचे बंकलगी विधी पार पडले. यंदा ‘उभा यात्रे’चा विधी केला जाणार नाही.

भाविकांना उन्हापासून वाचवण्याची तयारी
कडक उन्हाचा तडाखा पाहता पुरी प्रशासनाने उष्माघातापासून बचावासाठी ठोस व्यवस्था केली आहे. सुमारे 25 लाख पाण्याच्या बाटल्यांचा साठा करण्यात आला आहे. या वाटपाची जबाबदारी स्वयंसेवकांवर देण्यात आली आहे. गर्दीत तापमान वाढू नये म्हणून पाणी स्प्रिंकलर यंत्रणा बसवण्यात आली आहे. पाणी शिंपडण्यासाठी यंत्रांचा वापर केला जाणार आहे.

यासोबतच 72 रुग्णवाहिकाही यात्रा मार्गावर आपत्कालीन परिस्थितीत तैनात करण्यात येणार आहेत. रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *