मच्छिमाराच्या जाळ्यात अडकला नदीतला ‘राक्षस’, पाहून चक्रावून जाल…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ जुन । भारतासह जगभरातील नद्यांमध्ये चित्र-विचित्र मासे आढळून येतात. यातील काही मासे दानवाप्रमाणे वाटतात. टीव्हीवर रिव्हर मॉन्स्टर नावाचा कार्यक्रम यायचा, त्यातही अशाप्रकारचे मासे दाखवले जायचे. दरम्यान, इटलीतील पो नदीत (Po River) अशाच प्रकारचा एक मासा सापडला आहे. कॅटफिश जातीचा हा मासा इतका मोठा आहे की, तो पाहून तुम्हीही चकीत व्हाल.


मासा सापडल्यानंतर खळबळ उडाली आहे. हा एक Sakenewells catfish आहे, जो गरम हवामान असलेल्या ठिकाणी आढळतो. जगभरात कॅटफिशच्या अनेक जाती आढळतात. त्यांचा आकार खूप मोठा आहे. मात्र नुकत्याच सापडलेल्या माशांनी लांबीचा विक्रम मोडला आहे. इटलीच्या पो नदीत मच्छिमारांनी अँगलर तंत्राचा वापर करून हा महाकाय कॅटफिश पकडला आहे.

 

याची लांबी 9.4 फूट आहे. या माशाने एक नवा विश्वविक्रम रचला आहे. यापूर्वीचा विक्रम 9.2 फुटांच्या माशाच्या नावावर होता. इटलीतील सर्वात मोठ्या पो नदीच्या गढूळ पाण्यात हे मासे आढळतात. अॅलेसॅंड्रो बियानकार्डी नावाच्या मच्छिमाराने हा कॅटफिश पकडला आहे. आतापर्यंत सापडलेला हा सर्वात मोठा कॅटफिश आहे.

इतका मोठा मासा कधीच पाहिला नसल्याचे मच्छिमाराने म्हटले आहे. या माशाला परत पाण्यात सोडण्यापूर्वी त्याची लांबू मोजून IGFA इंटरनॅशनल गेम फिश असोसिएशनला पाठवण्यात आली. हा मासा संपूर्ण युरोपमध्ये आढळतो, पण गेल्या 25 वर्षांत इटली, फ्रान्स आणि स्पेनच्या नद्यांमध्ये त्यांची संख्या वाढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *