महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ जुन । International Yoga Day 2023 : सध्याचं जीवन फारच धकाधकीचं, ताणवयुक्त झालं आहे. त्यामुळे यातून जरा मनाला, मेंदूला आणि शरीराला शांतता आणि आरोग्य लाभावं या हेतूने या आंतरराष्ट्रीय योगा दिनाची सुरुवात झाली. भारतातला योग हे यानिमित्ताने जगभारत केला जाऊ लागला आणि हा दिवसही साजरा होऊ लागला.
त्याचाच एक भाग म्हणजे रोजच्या गडबडीच्या दिनश्चर्येत डोकं शांत ठेवायचं असेल तर ६-३-९ हा फॉर्म्युला फार उपयुक्त ठरतो.

आंतरराष्ट्रीय योग दिन
भारतीय संस्कृतीत ऋषीमुनींच्या काळापासून हा योग केला जात आहे. आता याची लोकप्रियता जगभरात पसरली आहे. योगाचे महत्व ओळखत भारतातने उचललेल्या या पाऊलाला जगभरातून पसंती मिळाली आणि हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा होऊ लागला. पंतप्रधान मोदी यांनी २७ सप्टेंबर २०१४ ला संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीत योग दिवसाचा प्रस्ताव ठेवला होता. हा प्रस्ताव मान्य झाला आणि २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होऊ लागला. सगळ्यात पहिल्यांदा २१ जून २०१५ ला हा दिवस साजरा झाला. यंदाचा हा ९ वा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे.
योगाचे महत्व
नर्व्हस सिस्टीम मेंदूद्वारा संपूर्ण शरीराला आणि त्याच्या आरोग्याला जपण्याचे काम करते. अशात योगाची फार महत्वाची भूमिका असते.
डिप्रेशन, स्ट्रेस डिसऑरडर, क्रॉनिकल पेन, एपिलेप्सी अशा आजारांपासून वाचण्यासाठी योग फार महत्वाचा ठरतो.
संशोधनानुसार जर वेगस नर्व स्ट्राँग असेल तर तणावावर मात दिली जाते. हे कसे करावे जाणून घेऊया.

काय आहे ६-३-९ फॉर्म्युला?
६-३-९ हा डोकं शांत करण्याचा फॉर्म्युला म्हणजे योग आहे.
यात आपण पहिले श्वास घेतो, मग तो आतच दाबून ठेवतो आणि नंतर हळूवारपणे सोडून देतो.
यासाठी सगळ्यात आधी ६ अंक मोजत हळूवार पण दीर्घ श्वास घ्यावा.
तो श्वास ३ सेकंद म्हणजे ३ अंक मोजत आतच धरून ठेवावा.
मग हळूवारपणे सोडत म्हणजे ९ अंक अर्थात ९ सेकंदात श्वास बाहेर सोडावा.
ही संपूर्ण कृती किमान ९ वेळा करावी.
याचे फायदे
३ सेकंद श्वास धरून ठेवणे आणि पुढच्या ९ सेकंदात श्वास हळूवार सोडणे या क्रियेमुळे आपल्या पॅरासिम्पेथेटिक नर्वस सिस्टीमला आराम मिळतो.
जेव्हा आपण श्वास घेतल्यावर सोडायला वेळ लावतो, तेव्हा यामुळे आपला मेंदू स्टिम्युलेट होतो. यामुळे मेंदू शांत रहायला मदत होते.
ओमकाराचे उच्चारणपण या नर्वला स्ट्राँग बनवण्याचे काम करते, आणि मनाला शांत ठेवते.
या योगचा परिणाम मेंदूवर होतो आणि ज्याचा फायदा मनाबरोबर शरीराच्या अनेक भागांना पोहचतो.