सर्वसामान्यांसाठी ! आता वैयक्तिक कर्ज, क्रेडिट कार्ड कर्ज घेणं सोपं नाही, RBIने बदलले नियम

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ जुन । छोटछोट्या गरजा पूर्ण करण्यासाठी अनेकजण लोक वैयक्तिक कर्ज घेतात. आत्तापर्यंत बँकांकडून वैयक्तिक आणि क्रेडिट कार्ड घेण्याचे नियमही तेवढे सोपे होते. मात्र, भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) आता नियम बदलले आहेत, ज्यामुळे वैयक्तिक तसेच क्रेडिट कार्डावर कर्ज घेणे पूर्वीप्रमाणे सोपे होणार नाही, कारण आता वरील कर्ज देण्यापूर्वी ग्राहकांची पार्श्वभूमी तपासली जाणार आहे.

वैयक्तिक कर्ज घेताना यापूर्वी बँका ग्राहकांची पार्श्वभूमी तपासत नव्हते किंवा जास्त वस्तू गहाण ठेवण्याची गरजही नव्हती. मात्र, आता नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. वैयक्तिक कर्ज त्वरीत आणि कोणत्याही तारणशिवाय उपलब्ध होते, त्यामुळे त्याचे व्याजदर इतर कर्जांपेक्षा जास्त आहेत. मात्र आता रिझर्व्ह बँकेनुसार सर्वसामान्यांसाठी वैयक्तिक आणि क्रेडिट कार्ड कर्ज घेणे सोपे नाही. आता असे कर्ज देण्यापूर्वी बँकांकडून ग्राहकांची पार्श्वभूमी तपासली जाईल आणि त्यानंतरच कर्ज देण्याबाबत विचार केला जाईल.

रिझर्व्ह बँकेचे नवीन नियम
आरबीआयच्या नवीन नियमांनुसार ग्राहकांना वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी हमी आवश्यक आहे. सोप्या प्रक्रियेमुळे वैयक्तिक आणि क्रेडिट कार्ड कर्ज घेण्याचा कल झपाट्याने वाढला असून अशा कर्ज बुडवणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. या कर्जांमध्ये ग्राहकांकडून हमीपत्र घेतले जात नसल्याने बँकांना तोटा सहन करावा लागत होता, पण आता आरबीआयच्या नव्या नियमानुसार वैयक्तिक कर्ज किंवा क्रेडिट कार्ड कर्जासाठी ग्राहकांची आर्थिक स्थिती आधी तपासली आणि त्यासोबत हमीपत्रही आवश्यक असेल, जेणेकरून थकबाकीदारांची संख्या कमी करता येईल.

वैयक्तिक कर्ज घेणे आता अवघड होणार
फेब्रुवारी २०२३ मध्ये वैयक्तिक कर्ज घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. याशिवाय वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर येत्या काळात थकबाकीदारांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आरबीआयला जाणवली. यामुळे केंद्रीय बँकेने नवीन नियम बनवून पर्सनल लोन आणि क्रेडिट कार्ड लोनचे नियम कडक केले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना वैयक्तिक कर्ज किंवा क्रेडिट कार्ड कर्ज घेणे कठीण होणार असून यासाठी त्यांना एक विशिष्ट प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *