Pulses Rate : सर्वसामान्यांच्या ताटातील डाळी महागणार?

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ जुन । डाळीच्या वाढत्या किंमतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकार आपल्या बाजूने पूर्ण प्रयत्न करतय. मात्र, तरीही तूरडाळ स्वस्त होत नाहीय़. उलट तूरडाळ अजून महागतेय. मागच्या दोन महिन्यात तूर डाळीच्या किंमतीत 30 ते 40 रुपये वाढ झाली आहे. आता एक किलो तूर डाळीची किंमत 160 ते 170 रुपये झाली आहे. आता सर्वसामान्य जनतेच्या ताटातून तूर डाळ जवळपास गायब झाली आहे.


केंद्र सरकारच्या आकड्यानुसार, देशात तूर डाळीच्या उत्पादनात घट झाली आहे. मागच्यावर्षीच्या तुलनेत देशात तूर डाळीच्या देशांतर्गत उत्पादनात 7.90 लाख टनांनी घट झालीय. 2022-23 च्या अंदाजानुसार देशात तूर डाळीचे उत्पादन घटून 34.30 लाख टन झालय.

किती उत्पादनाच लक्ष्य होतं?
देशात 45.50 लाख टन तूर डाळ उत्पादनाच लक्ष्य होतं. 2021-22 मध्ये 42.20 लाख टन तूरडाळीच उत्पादन झालं. सरकारने 2022-23 ;मध्ये तूरडाळीच्या उत्पादनात वाढ होईल, असा अंदाज वर्तवला होता. पण असं झालं नाही.

किती लाख डन डाळ आयात करणार?
केंद्र सरकारने डाळीच्या वाढत्या किंमती नियंत्रित करण्यासाठी अनेक पावलं उचलली आहेत. केंद्र सरकारने डाळीच्या स्टॉकच लिमिट निश्चित केलं आहे. केंद्र सरकारने 10 लाख टन तूर डाळ आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय आयात शुल्क सुद्धा हटवलय. डाळीच्या स्टॉकवर लक्ष ठेवण्यासाठी एक कमिटी बनवलीय.

भारत कुठल्या देशाकडून डाळ खरेदी करतो?
डाळ उत्पादनाच्या बाबतीत भारत आत्मनिर्भर नाहीय. आपली गरज भागवण्यासाठी भारत दरवर्षी दुसऱ्या देशातून डाळ आयात करतो. 2020-21 मध्ये भारताने 24.66 लाख टन डाळ आयात केली. 2021-22 मध्ये डाळा आयातीच्या आकड्यात 9.44 टक्के वाढ झाली. भारताने वर्ष 2021-22 मध्ये 26.99 लाख टन डाळ दुसऱ्या देशाकडून विकत घेतली. त्याचबरोबर भारतात जगातील सर्वात मोठा डाळ आयात करणारा देश बनला. भारत आफ्रिकी देश, म्यानमार आणि कॅनडा या देशाकडून सर्वाधिक डाळ खरेदी करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *