‘धोनी तोपर्यंत खेळणार नाही…’ गुडघ्याच्या दुखापतीवर CSK सीईओची महत्त्वाची माहिती

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ जुन । चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कासी विश्वनाथन यांनी खुलासा केला आहे की CSK कर्णधार एमएस धोनीच्या गुडघ्याची दुखापत त्याच्यासाठी अत्यंत गंभीर होती आणि तरीही त्याने याबद्दल कोणाकडेही तक्रार केली नाही. CSK च्या IPL 2023 च्या विजयात धोनीने एकही सामना खेळला नाही असं नाही. त्यानं संघाचं नेतृत्व केलं आणि त्याचा संघ आयपीएल जिंकला. त्यानंतर या समस्येवर मात करण्यासाठी या महिन्याच्या सुरुवातीला माजी भारतीय कर्णधाराच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

आम्ही त्याला कधीच ‘तुला खेळायचे आहे की बाहेर बसायचे आहे?’ असं त्याला विचारलं नाही. जर तो करू शकत नसेल तर त्यानं आम्हाला लगेच सांगितलं असतं’, असं विश्वनाथन ईएसपीएनक्रिकइन्फोशी बोलताना म्हणाले.

‘आम्हाला माहित होते की त्याच्यासाठी खेळणं हा एक संघर्ष होता, परंतु त्याची संघाप्रती असलेली बांधिलकी, त्याचे नेतृत्व आणि संघाला कसा फायदा होतो हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्या दृष्टीकोनातून, आपण त्याचं कौतुक केले पाहिजे’, असं ते म्हणाले.

‘फायनलपर्यंत, त्यानं कधीही त्याच्या गुडघ्याबद्दल कोणाकडेही तक्रार केली नाही. सर्वांना माहित असूनही, आणि तुम्ही त्याला धावताना संघर्ष करताना पाहिले असेल, परंतु त्यानं एकदाही तक्रार केली नाही. अंतिम फेरीनंतर, तो म्हणाला, ‘ठीक आहे, मी शस्त्रक्रिया करेन’. त्याची शस्त्रक्रिया पूर्ण झाली आहे, तो खूप आनंदी आहे, तो बरा होत आहे’, विश्वनाथन पुढे म्हणाले.

पाचवं आयपीएल विजेतेपद मिळविल्यानंतर धोनीनं हे उघड केलं की विजेतेपदाचा क्षण ‘सर्वोत्तम वेळ’ असेल. परंतु त्यानं शरीरानं परवानगी दिल्यास ‘किमान’ आणखी एका हंगामात परत येण्याची शपथ घेतली.

पुढील आयपीएल हंगाम सुरू होण्यास अद्याप नऊ महिने शिल्लक आहेत आणि शस्त्रक्रियेनंतरचे उर्वरित तीन आठवडे घेतल्यानंतर धोनी लवकरच पुनरागमन करण्यासाठी तयारी सुरू करणार आहे.

‘त्यानं आम्हाला सांगितलं की अंतिम सामना संपल्यानंतर तो मुंबईला जाईल, शस्त्रक्रिया करेल आणि पुनरागमनासाठी रांचीला परत जाईल’, असं विश्वनाथन यांनी सांगितलं.

‘मुंबईत, मी त्याला भेटायला गेलो होतो. मी सहज गेलो होता. तो खूपच आरामात आहे. त्यानं सांगितलं की तो तीन आठवडे विश्रांती घेईल आणि नंतर संघात पुन्हा खेळण्यासाठी प्रयत्न सुरू करेल’, अशी माहिती विश्वनाथन यांनी दिली. आपण खेळणार की नाही ही माहिती धोनी प्रथम एन श्रीनिवासन यांना देईल. त्यांच्याकडून आम्हाला माहिती मिळेल. 2008 पासून हे असंच असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *