निगडी येथील 130 वर्षे जुनी असलेल्या कोकाटे माडी धोकादायक इमारतीची जुन्या भाडेकरूंकडून होतेय डागडुजी

Spread the love

Loading

  • अपघाताची शक्यता, महापालिका प्रशासनाने लक्ष देण्याची नागरीकांकडून होतेय मागणी

पिंपरीः निगडी येथील मारुती मंदिर समोरील सुमारे 130 वर्षे जुनी असलेली नानीबाई कोकाटे माडी एक मजली इमारत जुने बांधकाम असून, ती इमारत धोकादायक इमारत म्हणून पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने जाहीर केले आहे. या ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने ताबडतोब घर खाली करून दुसरीकडे स्थलांतर होण्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती. मात्र आज पुन्हा जुने भाडेकरुंनी सदर धोकादायक इमारत ह्या ठिकाणी लोखंडी पत्रे वॉल कंपाऊंड करून बसविण्यात सुरू केले असून त्या संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त व फ क्षेत्रिय अधिकारी सिताराम फवरे साहेब काय कारवाई करणार? भविष्यात नानीबाई कोकाटे धोकादायक इमारत ह्या ठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता असून आजूबाजूला धोका निर्माण झाला असून समोर निगडी गावातील मारुती मंदिर असून सदर धोकादायक इमारत कधीही कोसळू शकते. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने ताबडतोब लक्ष द्यावे, व संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

सदर जागा मालक व नानीबाई कोकाटे माडी धोकादायक इमारत मधील जुनें भाडेकरुंचे दुसरीकडे स्थलांतर होण्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती. तरीही भाडेकरू याच इमारतीवर लोखंडी पत्र्याचे छप्पर बसविण्याचे काम करताहेत. परिणामी याचा आजूबाजूला धोका निर्माण झाला आहे.

सदर माडी मातीचे जुनं बांधकाम असून इमारत जीर्ण झालेल्या अवस्थेत असून, महापालिका प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर, सदर धोकादायक इमारत कधीही कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

माजी नगरसेवक, नगरसेविका यांनी धोकादायक इमारतीवर लोखंडी पत्रे बसविण्यात येवू नये म्हणून भाडेकरुंना समज दिली होती. तरीही भाडेकरूंच्या आडमुठ्या धोरणामुळे लोखंडी पत्रे बसविण्यात येत आहेत. ही धोकादायक इमारत पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.

नानीबाई कोकाटे माडी धोकादायक इमारत पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी ताबडतोब चारही बाजूने कंपाऊंड उभारुन सुरक्षित करण्यात यावे, जेणेकरून कोणीही धोकादायक इमारतीमध्ये बेकायदेशीरपणे लोखंडी पत्रे बसविण्यास येवू शकणार नाही. अन्यथा आजूबाजूच्या लोकांनाही धोका निर्माण होऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *