MS Dhoni Coach : जय शहा मोठ्या प्लॅनिंगमध्ये… ; धोनीच्या गळ्यात पडणार प्रशिक्षकपदाची माळ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ जुन । भारताचा दिग्गज माजी फलंदाज राहुल द्रविड सध्या भारतीय संघाचा प्रशिक्षक आहे. मात्र त्याच्या कार्यकाळात दोनवेळा भारतीय संघाला आयसीसी स्पर्धेमध्ये अजिंक्यपद जिंकण्याची संधी होती.

मात्र संघाला यात अपयश आले. नुकत्याच झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारताचा ऑस्ट्रेलियाने 209 धावांनी पराभव केला. यानंतर संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काही भारतीय चाहत्यांच्या मते राहुल द्रविडला प्रशिक्षक पदावरून लवकरात लवकर हटवले पाहिजे. बीसीसीआय देखील याबाबत एका मोठ्या प्लॅनिंगमध्ये आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा आता टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची नियुक्ती करण्याची शक्यता आहे.

राहित – राहुलची होणार सुट्टी?
भारतीय संघाचे सध्याचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या कार्यकाळात भारतीय संघाला एशिया कप 2022, टी 20 वर्ल्डकप 2022 आणि WTC Final 2023 यासारख्या महत्वाच्या स्पर्धांमध्ये अपयश आले आहे. त्यामुळे राहुल द्रविडच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.

राहुल द्रविड प्रशिक्षक झाल्यानंतर भारतीय संघ आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवेल असे वाटले होते. मात्र असं काही झालं नाही. त्यामुळे जय शहा लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. या वर्षी भारतीय संघ मायदेशात वनडे वर्ल्डकप खेळणार आहे.

जर यामध्ये देखील भारतीय संघाला विजेतेपद जिंकण्यात अपयश आले तर रोहित शर्मा आणि राहुल द्रविडची सुट्टी होऊ शकते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *