महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ जुन । देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकांपैकी एक असलेल्या अॅक्सिस बँकेने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन फीचर लाँच केले आहे. Axis Bank ने Axis Mobile Application वर आपले नवे फीचर ‘One-View’ लॉन्च करत असल्याची घोषणा केलीय. अॅक्सिस बँक ही खासगी क्षेत्रातील पहिली बँक आहे, जिने आपल्या ग्राहकांना बँकिंगचा चांगला अनुभव मिळण्यासाठी खाते एकत्रित करणाऱ्या इकोसिस्टमचा लाभ घेऊन ही नवीन बँकिंग सुविधा सुरू केली आहे.
नेमका काय फायदा होणार?
अॅक्सिस बँकेच्या या नव्या सुविधेमुळे ग्राहकांची आर्थिक बाबी हाताळण्याची प्रक्रिया सुलभ होईल आणि त्यांना एकाच प्लॅटफॉर्मवर अनेक बँक खात्यांमध्ये प्रवेश मिळेल, ज्यामुळे ग्राहकांना त्यांचा बॅलन्स आणि खर्च वास्तविक वेळेत पाहता येईल. अॅक्सिस बँकेचे अध्यक्ष आणि डिजिटल व्यवसाय प्रमुख समीर शेट्टी म्हणाले, “अॅक्सिस बँकेचा ‘ओपन’ बँकिंगच्या सामर्थ्यावर विश्वास आहे आणि आम्ही डिजिटल फर्स्ट उत्पादनांमध्ये सतत गुंतवणूक करीत आहोत. या प्रयत्नात आम्ही खाते एकत्रित करणाऱ्या इकोसिस्टमचा फायदा घेत अॅक्सिस मोबाइल अॅपवर वन व्ह्यू फीचर सुरू करीत आहोत.
Say goodbye to using multiple apps for your bank accounts! Experience the ultimate convenience with 'One View' on the Axis Mobile app. Easily check your account balance and track transactions in one place. Download now for hassle-free banking! https://t.co/IVKWcKM4HZ #AxisBank… pic.twitter.com/oNsGCi3NE9
— Axis Bank (@AxisBank) June 21, 2023
दुसरीकडे विशेष म्हणजे मोबाईल अॅपवर अॅक्सिस बँकेने वन व्ह्यू फीचर ही सुविधा लाँच केली आहे. ग्राहकांना अॅक्सिस मोबाइल अॅपमध्ये त्यांची गैर अॅक्सिस बँक खाती जोडणे, बँक खात्यांमधील त्यांचे खाते बॅलन्स आणि व्यवहार तपशील पाहणे आणि एकाधिक मोबाइल बँकिंग अॅप्स हाताळण्याचा त्रास दूर करणे यांसारख्या इतर सुविधादेखील मिळणार आहेत. खरं तर या अॅपच्या माध्यमातून विद्यमान आणि नवीन ग्राहकांना पूर्णपणे डिजिटल आणि पेपरलेस स्वरूपात त्वरित कर्जसुद्धा मिळणार आहे. विशेष म्हणजे ही कार्यप्रणाली पूर्णपणे डिजिटल असते. तसेच ग्राहकांना आनंद देण्याबरोबरच ऑपरेशनल कार्यक्षमता वाढवते.
अकाऊंट खरं तर या अॅपच्या माध्यमातून विद्यमान आणि नवीन ग्राहकांना पूर्णपणे डिजिटल आणि पेपरलेस स्वरूपात त्वरित कर्जसुद्धा मिळणार आहे. विशेष म्हणजे ही कार्यप्रणाली पूर्णपणे डिजिटल असते. तसेच ग्राहकांना आनंद देण्याबरोबरच ऑपरेशनल कार्यक्षमता वाढवते. खरं तर या अॅपच्या माध्यमातून विद्यमान आणि नवीन ग्राहकांना पूर्णपणे डिजिटल आणि पेपरलेस स्वरूपात त्वरित कर्जसुद्धा मिळणार आहे. विशेष म्हणजे ही कार्यप्रणाली पूर्णपणे डिजिटल असते. तसेच ग्राहकांना आनंद देण्याबरोबरच ऑपरेशनल कार्यक्षमता वाढवते.
अॅग्रीगेटर फ्रेमवर्कचा ग्राहकांना कसा फायदा होणार?
ग्राहकांना त्यांच्या लिंक केलेल्या खात्यांमधून व्यवहार तपशील डाऊनलोड आणि ईमेल करण्याची सुविधा
अॅक्सिस बँक खाती अॅक्सिस मोबाइल अॅपशी लिंक करण्याची प्रक्रिया सुलभ होणार
खात्यातील बॅलन्स आणि अनेक बँक खात्यांमधील व्यवहार तपशीलांची तात्काळ माहिती मिळणार
एकाहून अधिक मोबाइल बँकिंग अॅप्स व्यवस्थापित करण्याचा त्रास दूर होणार
ग्राहक त्यांच्या सोयीनुसार कोणतीही किंवा सर्व गैर अॅक्सिस बँक खाती डी-लिंक करू शकतात.