महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ जुन । तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrasekhar Rao) यांनी संपूर्ण मंत्रिमंडळ घेऊन पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी येणार असल्याची घोषणा केलीये. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपुरात कोणीही येऊ शकतं.
तिथं भक्तीभावानं या, पण राजकारणासाठी कोणी येऊ नये, असा टोला त्यांनी मुख्यमंत्री राव यांना लगावला. उपमुख्यमंत्री फडणवीस काल (गुरुवार) कऱ्हाडच्या (जि. सातारा) दौऱ्यावर होते. त्यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, भाजपचे सातारा लोकसभा प्रभारी अतुल भोसले आदी उपस्थित होते. तेलंगणाचे मुख्यमंत्री संपूर्ण मंत्रिमंडळ घेऊन पंढरपुरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणार आहेत.
त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, कोणालाही पंढरपुरला येता येईल. तिथं सर्वांचं स्वागत आहे. मात्र, राजकारणासाठी कोणी येवू नये. भक्तीभावाने तिथं आलं पाहिजे. त्या भावनेनं तिथं कोणीही येत असेल तर त्यांचं तिथं स्वागतच आहे, असा टोला त्यांनी लगावला.