Monsoon Update : महाराष्ट्रात आजपासून मुसळधार पाऊस ; या राज्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ जुन । भारतीय हवमान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये दक्षिण भारताचा काही भाग, ओडिशाचा उर्वरीत भाग, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मध्यप्रदेशाच्या काही भागांमध्ये मान्सूनसाठी (Monsoon) अनुकूल वातावरण निर्माण झालं आहे. ओडिशाच्या अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. यासोबतच अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि महाराष्ट्राच्या कोकण विभागात देखील जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि सिक्कीम या राज्यात हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

किनारपट्टीवरील भागांना इशारा
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आजपासून हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पूर्व राजस्थान, उत्तर प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम, महाराष्ट्र आणि त्रिपुरामध्ये विजेचा कडकडाट आणि वादळीवाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज केरळ, कर्नाटक, गोवा , कोकण आणि आंध्र प्रदेशच्या समुद्र किनाऱ्यांवरून प्रति तास 65 किलोमीटर वेगानं वारे वाहन्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर मच्छिमारांना समुद्रात मासेमारी करण्यासाठी न जाण्याचे आवाहन हवामान विभागाच्या वतीनं करण्यात आले आहे.

महारष्ट्राची स्थिती
हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात आजपासून मध्य महाराष्ट्र, विदर्भ मराठवाडा आणि कोकणामध्ये वादळीवाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसचे कोकण किनारपट्टीवर तीव्र गतीने वारे वाहनार असून, मच्छिमारांना समुद्रात मासेमारी करण्यासाठी न जाण्याचा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या अंदानुसार येत्या 24 तारखेपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार असून, याचदरम्यान मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *