महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. 25 जुन । काल शनिवारी मुंबई सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली. तर पुढील 5 दिवस राज्यांतील काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात पुढचे 5 दिवस मान्सून बहुतांश भागात सक्रिय असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोमवारी मुंबईमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर पहिल्याच पावसाने मुंबईची दैना झाली. कालच्या पावसाचे काही व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. (Latest Marathi News)
तर भर पावसामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील वरळी येथील कोस्टल रोड येथे जाऊन पाणी साचण्याच्या कारणे जाणून घेतली. तसेच येथील परिस्थितीची पाहणी केली. या भागात पाणी साचू नये याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी निर्देश दिले आहेत. आज जरी याठिकाणी पाणी नसले तरीही काल मुंबईत झालेल्या पहिल्याच पावसामुळे इथे पाणी साचून हा परिसर जलमय झाल्यामुळे येथे अनेक वाहने अडकून पडल्याने वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इथे भेट देऊन येथील परिस्थिती जाणून घेतली आहे.(Latest Marathi News)
तर यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कि, सकाळपासून मी मुंबईत पडत असलेल्या मुसळधार पावसाची पाहणी करत आहे. सुरुवातीला मी वरळी पोस्टल रोडची पाहणी केली. त्या ठिकाणी काम कुठपर्यंत आले आहे. दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी होते आहे का हे पाहून मी आता सांताक्रूझ मिलन सबवे या ठिकाणी आलेलो आहे.
या ठिकाणी दरवर्षी पाणी साचल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी व्हायची ती दिलेल्या सूचनांची पूर्तता केल्यानंतर आता वाहतूक सुरळीत रित्या सुरू आहे. ज्या ठिकाणी कामाची योग्य अंमलबजावणी होणार नाही त्या ठिकाणी निश्चित कारवाई करू मात्र प्रत्यक्षदर्शी तशी कुठलीही गोष्ट ही निदर्शनास आलेली नाही त्यामुळे कारवाई करण्याचा प्रश्नच उद्भवलेला नाहीये असं शिंदे म्हणालेत.