सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांना निवेदन देत केली हि मागणी …..

Spread the love

Loading

मोदी सरकारला देशात सत्तेत येऊन 9 वर्ष पूर्ण झाली आहेत.. यानिमित्त भाजपने मोदी @ 9 हे अभियान हाती घेतंलय. या अभियानाची जबाबदारी केंद्रातील मंत्र्यांकडे देण्यात आली आहे.. हे केंद्रीय मंत्री आता प्रत्येक राज्यात जाऊन मोदी सरकारची कामगिरी जनतेपर्यंत पोहोचवणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आज केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दाणवे यांचा दौरा पिंपरी-चिंचवड दौरा आयोजित करण्यात आला असून, त्यांनी आज पिंपरी-चिंचवड, भोसरीच्या नेत्यांशी तसेच व्यापाऱ्यांशी संवाद साधला आहे. दरम्यान, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या निवासस्थानी भोजन करून मंत्री रावसाहेब दाणवे आळंदी, भोसरीवरून निगडीमार्गे मुंबईकडे रवाना झाले. या दरम्यान निगडी येथील व्यापारी संघटनेला पेठ क्रमांक २४ भूखंड क्रमांक ८/९ निगडी व्यापारी संघटना यांना देण्यात यावा,या मागणीचे निवेदन निगडी येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी दाणवे यांना दिले.

सदर निवेदनात व्यापारी संघटनेद्वारे म्हटले आहे की, 2005 साली निगडी ते दापोडी रस्ता रुंदीकरण करण्यात आले होते त्या वेळी १३२ व्यापारी बांधव ह्यांच्या जमीन पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने संपादित केलेल्या होत्या. त्या संदर्भात पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण ह्यांनी सभा ठराव मंजूर करून पेठ क्रमांक २४ भूखंड क्रमांक ८/९ देण्यात आला म्हणून सभा ठराव २६० मंजूर करण्यात आला होता. मात्र आता निगडी येथील व्यापारी संघटनेला पेठ क्रमांक २४ भूखंड क्रमांक ८/९ निगडी व्यापारी संघटना यांना देण्यात यावा, केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांना सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांच्यावतीने निवेदन देण्यात आले.

दिनांक २८/१०/२००५ रोजी नंतर १५/२/२००६ रोजी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण यांच्याकडे निगडी व्यापारी संघटनेने दहा लाख रुपये जमा केले होते. सध्या पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण बरखास्त करण्यात आले आहे.. मात्र पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हा कारभार बघत असून, निगडी व्यापारी संघटना यांना भूखंड ताब्यात देण्याऐवजी बिल्डरला विक्री करण्यात आला असून, त्या संदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांना निगडी व्यापारी संघटनेच्यावतीने भूखंड देण्यात यावा यासाठी मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *