तुमचा चार्जर खराब झालाय? त्याला फेकू नका पुन्हा असा करा वापर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ जुन । इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब होणं हे सहाजिकच आहे. कधी त्यातील वायर खराब झाल्यामुळे तर कधी काही तांत्रिंक बिघाडीमुळे इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब होतात. त्यात चार्जर खराब होण्याची संख्या जास्त आहे. पण हे चार्जर खराब झाल्यावर दुसरं विकत घेतो आणि जुन्या चार्जरला फेकून देतो.

तुम्ही देखील जुन्या चार्जरला फेकून देत असाल, तर तुम्ही खूप मोठी चूक करताय. कारण ते फेकून न देता, त्याचा वापर तुम्ही आणखी दुसऱ्या गोष्टीसाठी करु शकता.

वास्तविक, घरातील लहान मुले अनेकदा चुकून स्वीच बोर्डमध्ये बोट घालतात. त्यामुळे त्यांना शॉक लागण्याचा धोका वाढतो. अशा प्रकरणात, तुम्ही तुमच्या स्विचमध्ये खराब चार्जर लावून ठेवू शकता. यामुळे लहान मुलांना स्वीच बोर्डच्या आत बोटे घालता येणार नाहीत आणि तुमचा खराब चार्जर येथे प्रभावी ठरेल.

सजावटीसाठी वापरा
तुम्ही विचार करत असाल की खराब चार्जरने आपण कसे सजवू शकतो? तर आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही जुन्या चार्जर केबलच्या मदतीने एक लहान घड्याळ बनवू शकता. ज्यामध्ये तुम्ही तुमच्या केसांच्या क्लिपसारख्या वस्तू ठेवू शकता, म्हणजेच जुन्या चार्जरच्या मदतीने तुम्ही तुमचे घरही सजवू शकता.

पेपरवेट
वास्तविक तुम्ही तुमचा जुना चार्जर पेपरवेट म्हणून वापरू शकता. तुम्ही जुन्या खराब चार्जरमधून केबल काढू शकता आणि वरील चार्जर पेपरवेट म्हणून वापरू शकता.

मुलांच्या खेळात वापरले जाते
अनेकदा अशा गोष्टी घरातील लहान मुलांना खूप आवडतात. जर तुम्ही केबल काढून त्यांना अडॅप्टर दिलं तर ते त्याच्याशी खेळू शकतात आणि त्यावर लिहिलेली अक्षरेही वाचू शकतात अशा प्रकारे तुमचा खराब चार्जर लहान मुलांच्या खेळातही वापरता येतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *