महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ जुन । तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. आज ते आणखी पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेणार आहेत. K Chandrashekar Rao तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा ताफा पंढरपूरच्या दिशेनं रवाना झाला आहे. त्यांच्यासोबत तेलंगणाचे संपूर्ण मंत्रीमंडळ आहे. आजच्या दिवशी ते श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन, त्याचबरोबर शेतकरी मेळावा, तुळजा भवानीचे दर्शन घेणार आहेत.
K Chandrashekar Rao : आम्ही विठ्ठलाच्या भक्तीसाठी इथे आलो आहोत, आम्ही राजकारणसाठी आलो नाहीत. मात्र, केवळ राजकारणासाठी आम्हाला अडवले जात असल्याचे मत तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी व्यक्त केलं.