कोरोनाचा नायनाट करणारे औषध सापडले ; योगगुरु रामदेवबाबांचा दावा;

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – पुणे – लक्ष्मण रोकडे – : कोरोना या जीवघेण्या व्हायरसने जगभरात अक्षरशः थैमान घातले आहे. त्यातच आपल्या देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा तीन लाखांच्या पार गेला आहे. सध्या जगभरातील अनेक देश या व्हायरसचा समूळ नाश करणाऱ्या औषधावर संशोधन करत आहेत. पण त्यापैकी अनेकांनी फक्त दावे केले आहेत, म्हणावे तसे यश या संशोधकांना मिळालेले नाही. त्यातच आता देशातील प्रसिद्ध असे योगगुरु रामदेव बाबा यांनी कोरोनाचा नायनाट करणारे औषध सापडल्याचा दावा केला आहे. त्याचबरोबर या औषधाने कोरोनाबाधित बरे होण्याचे प्रमाण जवळपास 99.99 टक्के असल्याचा दावा रामदेव बाबांनी केला आहे. रामदेव बाबा यांनी हा दावा एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रामदेव बाबा यांनी केलेल्या दाव्यानुसार त्यांच्या औषधाची क्लिनिकल ट्रायल पूर्ण झाली असून त्यांच्या मानवी चाचणीचेही निकाल काही दिवसातच हाती येतील. पण रुग्णांची रिकव्हरी मोठ्या प्रमाणात होत आहे. बाबांच्या दाव्यानुसार त्यांच्याकडे आयुर्वेदिक औषधांच्या संशोधनासाठी 500 वैज्ञानिकांची मोठी टीम आहे. केवळ कोरोनाच नव्हे तर वेगवेगळ्या रोगांवर औषध शोधण्याचे प्रयत्न त्यांची पतंजली ही संस्था सातत्याने करत असल्याचेही यावेळी रामदेव बाबा म्हणाले.

मुलाखती दरम्यान रामदेव बाबा म्हणाले की, आमचे कोरोनावर श्वासारी हे मुख्य औषध असून आम्ही जे कोरोनाला आळा घालण्यासाठी वापरत आहोत. कोरोना झाल्यानंतर त्या व्यक्तिला ठीक करण्यासाठी हे औषध वापरले जाऊ शकते, असे रामदेव बाबा म्हणाले. मुख्यत: गिलॉय धनवटी, तुलसी धनवटी आणि अश्वगंधा कॅप्सूल अशी चार औषधे आहेत. सर्दी, ताप, रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी याद्वारे मदत होऊ शकते. आम्ही या औषधांनी कॉम्लिकेशन्सवर 100 टक्के मात केली आहे. कोरोना संक्रमित झाल्यानंतर तो बरा करण्यासाठी या औषधांचा वापर होईल, असे रामदेव बाबांनी सांगितले.

कोरोनावर मात करण्यासाठी रामदेव बाबांनी सांगितलेल्या औषधांसह रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, कोरोनाकाळात करण्याचे योगासह अनेक मुद्द्यांवर माहिती दिली आहे. हा कार्यक्रम आज रात्री 9 वाजता एबीपी माझा या वाहिनीवर प्रसारित होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *