महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ जुन । Dandruff In Hair: अनेक महिलांना तसेच पुरुषांना देखील केसात कोंडा होण्याच्या समस्या असतात. केसांमधील कोंडा जास्त झाल्यास त्याने डोक्यात खाज येते. सतत खाजवल्याने डोक्याच्या त्वचेवर जखमाही होतात. अशा समस्यांवर नागरिक विविध उपाय करतात. विविध प्रकारचे शँम्पू वापरतात. मात्र यात केमीकल असल्याने स्कीन आणखीन खराब होते. तसेच केस देखील जास्त गळू लागतात. अशा समस्या टाळण्यासाठी काही घरगुती उपाय देखील आहेत. (Latest Marathi News)
कढीपत्त्याचे तेल
कढीपत्ता (Curry Leaves) आपण जेवणात प्रत्येक पदार्थात वापरतो. त्याने जेवणाला एक चव येते. मात्र अनेक व्यक्ती जेवणातील कढीपत्ता नंतर निवडून टाकतात. तो खात नाहीत. असे केल्याने कढीपत्त्यामुळे मिळणारी पोषक तत्वे त्यांना मिळत नाहीत. परिणामी त्यांना केसांच्या समस्या जाणवतात. त्यामुळे अशा व्यक्तींनी खोबरेल तेलात कडीपत्ता टाकून गरम करुन घ्यावे. त्याने तुमच्या केसांना चकाकी मिळते. तसेच केसांत कोंडा होत नाही.
कोरफडीचा गर
कोरफड फार थंड असते. कोंडा (Dandruff) झाल्याने डोक्याची स्कीन दुखू लागते. अशा वेळी तुम्ही कोरफडीतला गर लावू शकता. कोरफडीतला गर आणि त्यात काही चमचे तेल टाकून तु्म्ही ते मिश्रण केसांत लावावे. हे मिश्रण केसांत साधारण आर्धातास तसेच ठेवावे. त्यानंतर केस धुवून घ्यावेत. याने देखील चांगलाच आराम मिळेल.
केसांत कोंडा कशाने होतो?
केसांची निगा राखणे महत्वाचे आहे. अनेक व्यक्ती केस (Hair) वेळेवर स्वच्छ धुवत नाहीत. केसांत घाम आल्याने केसांत कोंडा होतो. तसे होऊनये यासाठी केस कायम स्वच्छ ठेवावेत. थंडीच्या दिवसात अनेक मुली केस धुण्याचा कंटाळा करतात. मात्र यामुळे थंडीच्या वातावरणात कोंडा वाढण्याची शक्यता आणखी वाढते.