Aashadhi Wari 2023 :राज्यात काम करण्यासाठी आणखी बळ मिळो मुख्यमंत्र्यांची विठूरायाचरणी प्रार्थना; नगरच्या काळे दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ जुन । आषाढी एकादशीनिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक पांडुरंगाची शासकीय महापूजा केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत मानाचा वारकरी म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील काळे दांपत्याला शासकीय पूजेचा मान मिळाला. भाऊसाहेब काळे आणि मंगल काळे हे दाम्पत्य गेल्या 25 वर्षापासून पंढरपूरची पायी वारी करत आहेत. आज त्यांना शासकीय पूजेचा मान मिळाला. विठ्ठलाची पूजा करण्याचा सर्वात आधी मान मिळाल्याने आम्ही धन्य झालो, असं भाऊसाहेब काळे म्हणाले. तर बा विठ्ठला… तुझ्या आशीर्वादाने सर्व सुरळीत होऊ दे, असं साकडं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाला घातलं.

आज पहाटेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी विठ्ठलाची महापूजा केली. यावेळी त्यांच्यासोबत नगर जिल्ह्यातील भाऊसाहेब काळे आणि मंगल काळे यांना शासकीय पूजेचा मान मिळाला. भाऊसाहेब काळे हे 25 वर्षापासून वारी करत आहेत. देवगड ते पंढरपूर भास्करगिरी महाराज यांच्या सोबत काळे दांपत्य पंढरीची वारी करतात. भाऊसाहेब काळे व्यवसायाने शेती करतात. काल आठ तास दर्शन रांगेत काळे दांपत्य उभे होते.

काळे दाम्पत्यांचा सत्कार
श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची महापूजा झाल्यानंतर सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत भरत शेठ गोगावले, मंत्री दीपक केसरकर, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील तसेच मानाचे वारकरि श्री व सौ भाउसाहेब काळे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काळे दाम्पत्यांचा सत्कार करण्यात आला.

आराखडा विश्वासात घेऊनच
पांडुरंगाची भक्तीभावे पूजा केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीडियाशी संवाद साधला. विठ्ठलाकडे राज्याच्या भल्याचं साकडं घातल्याचं ते म्हणाले. सलग दुसऱ्या वर्षी आषाढी वारी पूजा करण्याची मला संधी मिळाली मी माझे भाग्य समजतो. बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, हे राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, असं साकडं विठ्ठलाला घातलं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. पांडुरंगाच्या आशीर्वादाने राज्याचं सगळं काम सुरळीत सुरू आहे. पंढरपूरचा विकास आराखडा सगळ्यांना विश्वासात घेऊनच केला जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

यामागे विठ्ठलाचाच आशीर्वाद
राज्यात काम करण्यासाठी आणखी बळ मिळो हीच विठ्ठलाचरणी प्रार्थना आहे. मुख्यमंत्री पद मिळालं यामागे खरंच विठ्ठलाचा आशीर्वाद आहे. आजच्या दिवस चांगला आहे. विरोधकांनी चुकत असेल, काही सूचना असतील तर द्याव्यात. मात्र सरकाय चांगलं काम करतंय, असं खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *