जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीम; २६ जुलैपर्यंत करा अर्ज

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.३० जुन । पुणे: जिल्ह्यात जात पडताळणी समितीमार्फत २६ जुलैपर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा पुणे जिल्हा जात पडताळणी समिती अध्यक्ष डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी दिली.

या मोहिमेअंतर्गत शाळा शिकत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शाळेतच जात प्रमाणपत्र देण्यासोबत इयता अकरावी आणि बारावीच्या विज्ञान शाखेतील विद्यार्थी, सीईटी परीक्षेला बसलेल्या, पदविका तृतीय वर्ष अभ्यासक्रम प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र शाळेतच मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विभागीय शिक्षण उपसंचालक, प्राथमिक आणि माध्यमिक गटशिक्षण, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, शाळा मुख्याध्यापक यांच्या मार्फत आवश्यक नियोजन आणि सक्षम कार्यप्रणाली निश्चित करण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यात आली आहे, असे देवरे यांनी सांगितले.

मागासवर्गीय विद्यार्थी जात प्रमाणपत्रापासून वंचित राहू नये, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. यामध्ये शाळा आणि महाविद्यालये यांच्याकडून समन्वय (नोडल) अधिकारी या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. शाळा, महाविद्यालयातील मागासवर्गीय विद्याथ्यांचे परिपूर्ण अर्ज घेऊन ते जिल्हा जात पडताळणी समिती तसेच उप विभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्या कार्यालयाशी समन्वय साधून विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यास मदत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *