बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतनं राहत्या घरी केली आत्महत्या

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – मुंबई – विशेष प्रतिनिधी – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत  यांनं आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. मुंबईच्या वांद्रे येथील राहत्या घरी सुशांतनं आत्महत्या केली. सुशांतसिंग राजपूत एकता कपूरच्या पवित्र रिश्ता या मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आला. ‘काय पो छे!’ या चित्रपटात सुशांत मुख्य अभिनेता होता. महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्यावर चित्रित करण्यात आलेल्या एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी या सिनेमातही काम केलं होतं.

दरम्यान, आतापर्यंत सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येचं कारण अस्पष्ट आहे. मुंबई पोलीस वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरी पोहचले असून रिपोर्ट्सनुसार सुशांतच्या नोकरानं पोलिसांनी फोनकरून याबाबत माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *