Food Inflation : भाजीपाल्या सोबत आता हे मसाल्याचे पदार्थही होणार महाग

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१ जुलै । मान्सूनच्या आगमानासोबत महागाईने आपले रूप दाखवायला सुरुवात केली आहे. यामुळे सामान्य नागरिकांना याची झळ बसत आहे. लोकांना माहीत आहे की, टमाटर आणि हिरवा भाजीपाला महाग झाला आहे. अदरक आणि लसूणच्या भावातही प्रचंड वाढ झाली आहे.

मध्य प्रदेशातील शाजापूर जिल्ह्यात लसूणच्या होलसेल रेटमध्ये वाढ झाली आहे. चिल्लर बाजारातही लसूणचे भाव वाढले. १०० ते १२० रुपये किलो विकणाऱ्या लसूणची किंमत आता चिल्लर बाजारात १४० रुपये झाली आहे.

दुकानदार सांगतात की, येत्या दिवसांत मसाल्याच्या किमतीत वाढ होईल. गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त उत्पादन झाल्याने लसुणचे भाव कमी होते. त्यामुळे शेतकऱ्यांना लसूण फेकून द्यावा लागला होता. पण, आता भाव वाढत आहेत.

अदरकच्या किमतीत वाढ झाली आहे. १२० ते १४० रुपये किलो विकणारा अदरक आता शाजापूर जिल्ह्यातील चिल्लर बाजारात २५० रुपये किलो झाले. हिरव्या मिरचीची किंमतही १५० रुपये किलो झाली आहे.

जीराही ठोक मार्केटमध्ये महाग झाले. किंमत किती वाढली हे खरेदी करण्यापूर्वी विचार करा. बाजारात जीऱ्याचा भाव ५८ हजार रुपये क्विंटल झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *