Buldhana Bus Accident : टायर फुटून बसचा अपघात नाही ; RTO ने दिलेल्या अहवालात धक्कादायक माहिती समोर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१ जुलै । विदर्भ ट्रॅव्हल्स खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. ही बस एसी बस असल्याची माहिती मिळाली आहे. नागपूरहून ती पुण्याच्या दिशेनं येत असताना समृद्धी महामार्गावर हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. या अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघातातून ड्रायव्हर वाचला आहे. त्याला पोलिसांनी अटक केली असून चौकशी सुरू आहे.

या अपघातानंतर आता तपास सुरू झाला आहे. आरटीओकडून प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला. या अहवालात आणि ड्रायव्हरने दिलेल्या माहितीमध्ये तफावत आहे. ड्रायव्हरच्या म्हणण्यानुसार टायर फुटून भीषण अपघात झाला. मात्र आरटीओनं दिलेल्या अहवालात बसचा टायर फुटलाच नाही अशी माहिती समोर आली आहे.

टायर फुटल्याने बसचा अपघात झाला नाही. बस अपघातातबाबत अमरावतीच्या आरटीओने अहवाल सादर केला आहे. या प्रकरणी गृह विभागाकडून अपघाताची चौकशी सुरु करण्यात आली आहे. दरम्यान चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाला असू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *