महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ जुलै । अखिल मराठी पत्रकार संघ संलग्न(म. राज्य)पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघ व डिजीटल मिडीया अंतर्गत संघाचे संस्थापक अध्यक्ष मा. बापूसाहेब गोरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी अनाथ आश्रम ला अन्नदान वाटप केले तसेच वृक्षारोपण करण्यात आले. सर्व पत्रकारांनी एकत्र येऊन केक कापण्यात आला.
यावेळी 10,12 वीच्या विध्यार्थीनींचा सत्कार करण्यात आला . तसेच डिजीटल मिडीया च्या पत्रकारांना आयडी कार्ड वाटप करण्यांत आले आहे. शहरांत सामाजिक राजकिय क्षेत्रांतील मान्यवरांनी बापूसाहेब गोरे यांना शुभेच्छा दिल्या . यावेळी पिं. चिं. शहर प्रिंट मिडीया,अध्यक्ष दादाराव आढाव व पिं चिं डिजीटल मिडिया अध्यक्ष भिमराव तुरूकमारे,संतलाल यादव जेष्ठ पत्रकार गणेश शिंदे जेष्ठ पत्रकार ,यशवंत गायकवाड, यांची उपाध्यक्षपदी निवड केली. या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात पत्रकार बांधव उपस्थित होते.