महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ जुलै । अजित पवारांच्या बंडामुळं राज्याच्या राजकारणात नवी समीकरण मांडलं गेलं आहे. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आहे. मी याला भूकंप मानत नाही, असं काहीतरी होईल याची आम्हाला पक्की माहिती होती, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच राज्याला नवा मुख्यमंत्री मिळेल असा दावाही त्यांनी केला आहे. (Sanjay Raut on Maharashtra Politcs Maharashtra got new Chief Minister)
राऊत म्हणाले, मी याला भूकंप मानत नाही. राजकारणात ज्या गोष्टी घडणार होत्या त्या घडल्या आहेत. याची आम्हाला पक्की माहिती होती. आत्ताच्या सरकारकडं आकडा असतानाही त्यांना अजित पवारांची गरज लागते. यावरुन एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाणार असल्याचं हे पहिलं पाऊल आहे. एक इंजिन बंद पडण्याच्या मार्गांवर आहे, त्यामुळं दुसरं इंजिन सरकारला जोडलं आहे.
मंत्री मंडळाचा विस्तार शिंदे गटाचा व्हायचा होता
या घडामोडींनंतर माझ पवार साहेबांशी बोलणं झालेलं आहे. तसेच शरद पवारांचं उद्धव ठाकरेंशी बोलणं झालेलं आहे. लोकांचा राज्यातील या नव्या समिकरणाला पाठिंबा नाही, भविष्यात आम्ही एकत्र आहोत. मुख्यमंत्र्यांसह जे गेले त्यांचे चेहरे पाहा मग त्यांच्या वेदना समजून घ्या. शिंदे गटाचे नेते होते त्यांचे चेहरे पाहा. शिंदे अपात्र ठरतील राज्याला नवा मुख्यमंत्री मिळेल. मी सामनातून व्यक्त केलं होत मी बोललो होतो ते खरं ठरलं आहे. महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री मिळेल हे माझ भाकीत नसून माझ पक्क मत आहे.