३ तारखेपासून ‘या’ कंपनीने वाढवल्या बाईक-स्कुटरच्या किमती, आता मोजावे लागणार जास्त पैसे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ जुलै । दुचाकी उत्पादक Hero MotoCorp ने शुक्रवारी ३ जुलैपासून मोटारसायकल आणि स्कूटरच्या किमतीत सुमारे १.५ टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली. कंपनीने सांगितले की, इनपुट कॉस्ट आणि अनेक कारणांमुळे ही वाढ करण्यात आली आहे. वेगवेगळ्या मॉडेल आणि मार्केटच्या आधारे किंमत ठरवली जाईल, असे कंपनीने म्हटले आहे.

यापूर्वी एप्रिलमध्येही Hero MotoCorp ने दुचाकींच्या किमतीत दोन टक्क्यांपर्यंत वाढ केली होती. कंपनीने सांगितले की, मोटारसायकल आणि स्कूटरच्या किमतीत झालेली वाढ हा कंपनीकडून वेळोवेळी केलेल्या किमतीच्या पुनरावलोकनाचा एक भाग आहे. किंमत स्थिती, उत्पादन खर्च आणि व्यवसायाची गरज यासारख्या विविध बाबी लक्षात घेऊन कंपनी हा आढावा घेते. Hero MotoCorp ने म्हटले आहे की, ते ग्राहकांवरील प्रभाव कमी करण्यासाठी नाविन्यपूर्ण वित्तपुरवठा कार्यक्रम सुरू ठेवतील.

या महिन्याच्या १ तारखेला ई-स्कूटर्स महागल्या
देशातील स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर्सचे युग संपत असल्याचे दिसत आहे. या महिन्याच्या १ जूनपासून भारतात विकल्या जाणार्‍या सर्व इलेक्ट्रिक स्कूटर महाग झाल्या आहेत. कारण १ जून किंवा त्यानंतर नोंदणीकृत इलेक्ट्रिक दुचाकींना केंद्र सरकारकडून देण्यात येणारे अनुदान (FAME 2) कमी करण्यात आले आहे, ज्यामुळे कंपन्या ग्राहकांना पूर्वीइतका लाभ देऊ शकत नाहीत.

काय प्रकरण आहे?
गेल्या महिन्यात, भारत सरकारच्या उद्योग मंत्रालयाने एक नवीन अधिसूचना जारी केली होती. या अंतर्गत, मंत्रालयाद्वारे समर्थित FAME-II योजनेअंतर्गत १ जूनपासून इलेक्ट्रिक स्कूटरसाठी सबसिडी कमी केली जात आहे. याचा अर्थ असा की एकदा बदल अंमलात आल्यानंतर, दुचाकी ईव्हीसाठी कमाल अनुदान वाहनाच्या सध्याच्या ४० टक्क्यांवरून १५ टक्क्यांपर्यंत खाली येईल. दुसरीकडे, सध्याच्या १५,००० रुपयांऐवजी EV च्या बॅटरी क्षमतेसाठी १०,००० रुपये प्रति किलोवॉट सबसिडी असेल. सध्याच्या नियमानुसार, ही सबसिडी ईव्ही बनविण्यावर प्रति वाहन ६०,००० रुपयांपर्यंत बसते. मात्र आता तो प्रति वाहन २२,५०० रुपयांपर्यंत खाली आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *