महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ जुलै । अजित पवार भाजपबरोबर जाणार का? या गेल्या अनेक दिवसांपासून उपस्थित होत असलेल्या प्रश्नाला अखेर रविवारी उत्तर मिळाले. अजित पवारांनी छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ यासह राष्ट्रवादीच्या अनेक बड्या नेत्यांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत, धक्का दिला. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादीच्या नऊ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
गेल्या वर्षभरापूर्वी शिवसेनेत झालेल्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या या बंडामुळे राज्यात राजकीय भूकंप नव्हे तर त्सुनामी निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने हा निर्णय त्यांचा नसून अजित पवार आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचे म्हटले आहे.
शिवसेनेतील भूकंपानंतर राज्यात अनेक राजकीय पेच निर्माण झाले होते. त्याचप्रमाणे आता या घटनेनंतरही अनेक पेच पाहायला मिळणार का? असा मुद्दा उपसस्थित होत आहे. मात्र या राजकीय संकटानंतर आता राज्यासमोरही अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. अशाच काही प्रश्न सध्या राज्याच्या राजकारणात उभे राहिले आहेत.
१ : राष्ट्रवादीला कंटाळून बंड केला, आता शिंदे आणि त्यांचे आमदार काय करणार?
२ : राहुल नार्वेकरांचा क्रांतिकारी निर्णय काय असणार ? आणि कधी लागणार ?
३ : अजित पवार उपमुख्यमंत्री पदावर खरंच समाधानी राहणार का ?
४ : देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदी कायम राहणार का?