मनुष्यासह सॄष्टीतील प्रत्येक प्राणीमात्रांचे कल्याण हाच भगवानांचा संदेश – महासाध्वी दक्षिण चंद्रिका

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.३ जुलै । या सॄष्टीतील प्रत्येक प्राणीमात्रांचे कल्याण व्हावे व सुखी जीवनाचा आनंद त्यांनी घ्यावा हाच चातुर्मास पर्वातील भगवानांचा संदेश असल्याचे महासाध्वी दक्षिण चंद्रिका यांनी म्हटले.पिंपरी चिंचवड जैन संघाचे वतीने चातुर्मास पर्वाच्या प्रारंभ दिनी आज शोभायात्रा संपल्यानंतरच्या पहिल्या दिवशीच्या प्रवचन संदेशात त्या बोलत होत्या.प्रारंभी सकाळी साडेसात वाजता भव्य शोभायात्रा व पराक्रमी महापुरूषांच्या वेषातील विद्यार्थ्यांच्या रॅलीने संपूर्ण पिंपरी चिंचवडकरांचे लक्ष वेधून घेतले होते.

आपल्या संदेश प्रवचन पर्वात बोलताना महासाध्वी दक्षिण चंद्रिका यांनी पुढे म्हटले की, मनुष्य जन्म हा कर्म आणि परिश्रमाची सुखद व आनंददायी अनुभूती असून मनावरील नियंत्रण हाच जीवन संकल्प पूर्तीचा पाया असल्याचे त्यांनी नमूद केले.या प्रसंगी प.पू.डॉ. श्री संयमलताजी, साध्वी श्री अमित प्रज्ञा जी, साध्वी श्री कमल प्रज्ञा जी,आणि सौरभ प्रज्ञा जी यावेळी उपस्थित होते.

निगडी येथील मिशनकुंज पासून सुरू झालेल्या भव्य मिरवणूकी मध्ये राजा राणी रथ, १४ स्वप्न रथ, तसेच बाल शिवाजी, भगतसिंग, झाशीची राणी लक्ष्मीबाई या वेशभूषेतील विद्यार्थी सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या.

कलश घेतलेल्या पारंपारिक वेशातील महिला, शेकडो विद्यार्थी  आणि पांढर्याशुभ्र कपड्यातील हजारो स्थानकवासी जैन बांधव या शोभा यात्रेत सहभागी झाले होते. पंचरंगी जैन ध्वजांमुळे शोभा यात्रेचा सौंदर्यात भरच पडत होती.  मंगल प्रवेश व शोभा यात्रेला सकाळी साडेसात वाजता निगडी येथील मितेशकुंज‘ येथून भव्य मिरवणूकीने  सुरूवात होऊन लोकमान्य हॉस्पिटल TV-भेळ चौक -बिग इंडिया -हुतात्मा चौका मार्गे पाटीदार भवन येथे समाप्त झाली. संपूर्ण चातुर्मास पाटीदार भवनमध्ये होणार असून येणाऱ्या पाच महिन्यात प्रवचनधार्मिक व सामाजिक कामेही केली जाणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *