Maharashtra Monsoon Update: राज्यात पुढचे ३ दिवस पाऊस कोसळणार, या ४ भागांना IMD कडून अतिवृष्टीचा इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.३ जुलै । राज्यात गेल्या दोन दिवसांमध्ये पावसाचा जोर ओसरल्याचं पाहायला मिळालं. जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये धुवांधार झालेला पाऊस आता कमी झाला आहे. पण अशातही राज्यात जुलैचा पहिला आठवडा मुसळधार पाऊस असेल असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. खरंतर, राज्यात पुढील ४ ते ५ दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. यामुळे अनेक जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्टही देण्यात आला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर ओरसला आहे. हा एल निनोचा प्रभाव आहे. यामुळे घाटमाथा सोडला तर काही जिल्ह्यांमध्ये तुरळक पाऊस होईल. तर विदर्भात २ दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. ज्यामुळं इथं यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, मराठवाड्यात हलक्या-मध्यम पावसाची शक्यता असून इथंही काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

दरम्यान, मुंबईच्या वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात ५ जुलैपर्यंत उत्तर-दक्षिण कोकण, गोवा आणि पूर्व-पश्चिम विदर्भात अतिमुसळधार पाऊस होणार आहे. तर इतर भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल तर घाटमाथावर पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळेल.

उत्तर कोकण (North Konkan )- हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्याच्या सुरूवातीपासूनच उत्तर कोकणात पाऊस सुरू आहे. अशात ५ जुलैपर्यंत उत्तर कोकणात सर्वत्र मुसळधार पाऊस असणार आहे.

दक्षिण कोकण आणि गोवा (South Konkan & Goa )- दक्षिण कोकण आणि गोव्यातही ५ जुलैपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागांत सर्वच जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे.

उत्तर मध्य महाराष्ट्र (North Madhya Maharashtra )- उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरकळ ठिकाणी पाऊस होईल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. तर ५ जुलैला मात्र जिल्ह्यात सर्वत्र पाऊस असेल अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *