महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – मुंबई – विशेष प्रतिनिधी – लक्ष्मण रोकडे – गेल्या अनेक दिवसांपासून आरोपांची फैरी झाडलेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या आरोपांना नाव न घेता तितकेच जोरदार प्रत्युत्तर दिलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आज प्रथमच भेट झाली. कोकण दौरा संपवून फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले. दोन्ही नेत्यांची भेट मुंबईतील बाळासाहेब ठाकरे स्मारकात झाली.
फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी केंद्राच्या आत्मनिर्भर पॅकेजनुसार मदत करावी असे आवाहन केल्याचे त्यांनी सांगितले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेले मुद्दे
वादळानंतर कोकणात जी परिस्थिती निर्माण झाली होती ते सत्य मुख्यमंत्र्यांसमोर मांडले
निवाऱ्याच्या नावावर लोकांना शाळेत कोंडून ठेवले आहे तेथे कसलेही शारिरीक अंतर नाही
लोकांना पत्रे उपलब्ध करून द्यावेत
मासेमारी करणाऱ्या बांधवांचे सर्व कर्ज माफ करावी
छोट्या दुकानदारांना आर्थिक मदत द्यावी
कोकण पुन्हा उभे करण्यासाठी सरकार कोणतीही कार्यवाही करत नाहीए
वादळानंतर कोकणवासियांना एक रूपयाही मदत गेलेली नाही