महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – संभाजीनगर – विशेष प्रतिनिधी – आनंद चौधरी – जिल्ह्यात कोरोनाबाधीतांच्या आकड्यात मोठ्या प्रमाणात गुणाकार होत चालला आहे. आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार, ११३ नवे कोरोनोबाधीत रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे बाधीतांच्या संख्येत वाढ झाली असुन २ हजार ७३९ इतकी झाली आहे. यापैकी १ हजार १४५ जणांवर उपचार सुरू असुन १ हजार ४५१ जण कोरोनामुक्त झाले असुन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे, राजाबाजार (२), न्यू हनुमान नगर (२), बायजीपुरा(१), खोकडपुरा (२), बंबाट नगर, बीड बायपास (२), साई नगर, एन सहा (२), राजमाता हाऊसिंग सोसायटी (१), माया नगर, एन दोन (३), संजय नगर, आकाशवाणी परिसर (१), रशीदपुरा (२), यशोधरा कॉलनी (२), सिडको पोलिस स्टेशन परिसर (१), सिल्क मील कॉलनी (१), किराडपुरा (१), पीरबाजार (१), शहानूरवाडी (१), गजानन मंदिर परिसर, गारखेडा (२), अहिल्या नगर, मुकुंदवाडी (१), जहाँगीर कॉलनी, हर्सुल (१), कैलास नगर (१), समर्थ नगर (१), छावणी परिसर (४), गौतम नगर (१), लमंडी (५), भाग्य नगर (१), गजानन नगर, गल्ली नं नऊ (४), मंजुरपुरा (१), मदनी चौक (१), रांजणगाव (१), बेगमपुरा (१), रेहमानिया कॉलनी (१), काली मस्जिद परिसर (१), क्रांती चौक परिसर (१),
तर, विश्रांती नगर (१), कन्नड (५), जिल्हा परिषद परिसर (४), देवगिरी नगर, सिडको वाळूज (१), बजाज नगर (१५), राम नगर (१), देवगिरी कॉलनी सिडको (२), वडगाव कोल्हाटी (२), स्नेहांकित हाऊसिंग सोसायटी (१), नक्षत्र वाडी (२), बकलवाल नगर, वाळूज (१), सलामपूर, पंढरपूर (११), वलदगाव (१), साई समृद्धी नगर कमलापूर (२), अज्वा नगर (१), फुले नगर, पंढरपूर (४), गणेश नगर, पंढरपूर (१), वाळूजगाव, ता. गंगापूर (१), शाहू नगर, सिल्लोड (१), मुस्तफा पार्क, वैजापूर (१), अन्य (२) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये ३८ स्त्री व ७५ पुरूष रुग्णांचा समावेश आहे.