महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.६ जुलै । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बुधवारी क्रेडिट कार्ड आणि डेबिट नियमांमध्ये बदल करण्यासाठी एक परिपत्रक जारी केले आहे. बँकेने एका परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. आरबीआयने घेतलेल्या निर्णयानंतर डेबिट, प्रीपेड कार्डचे नियमही बदलले जाऊ शकतात. कोणतेही कार्ड कोणत्याही विशिष्ट नेटवर्कसाठी नव्हे तर सर्व नेटवर्कसाठी वापरता येण्यासाठी परवानगी द्यावी, असंही आरबीआयने परिपत्रकात म्हटले आहे.
आरबीआयने परिपत्रक केले जारी
आरबीआयने एक परिपत्रक जारी केले आहे. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, प्रीपेड कार्ड सर्व नेटवर्कसाठी वापरावे, असे बँकेने या परिपत्रकात म्हटले आहे. बँकेने यासाठी जनतेचे मतही मागवले आहे. त्यानंतर डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या या नियमात बदलही केला जाऊ शकतो.
RBI ने नियम बदलल्यास फायदा काय?
तुम्ही कार्डाद्वारे आता कोणत्याही व्यापाऱ्याशी सहज व्यवहार करू शकणार आहात. कार्ड नेटवर्क व्यापारी आणि कार्डधारक यांच्यातील व्यवहार सुलभ करते. कार्ड नेटवर्क एक प्रकारची पायाभूत सुविधा प्रदान करते. कार्ड नेटवर्क यासाठी शुल्क देखील आकारते. कार्ड नेटवर्क कंपन्यांबद्दल बोलायचे झाल्यास यात चार मुख्य क्रेडिट कार्ड नेटवर्क म्हणजे मास्टरकार्ड, व्हिसा, अमेरिकन एक्सप्रेस आणि डिस्कव्हर यांचा समावेश आहे. यापैकी दोन कंपन्या कार्ड जारी करणाऱ्याही आहेत. हे Amex आणि Discover आहे. जेव्हा तुम्ही कार्डने पेमेंट करता तेव्हा क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट कुठे करता येईल हे कार्ड नेटवर्कद्वारे ठरवले जाते. तुम्ही कधी दोन वेगवेगळ्या क्रेडिट कार्डच्या सुविधा पाहिल्या तर तुमच्या लक्षात येईल की, जी सुविधा एका कार्डवर उपलब्ध आहे ती दुसऱ्या कार्डवर उपलब्ध नसते. प्रत्येक व्यापारी किंवा दुकानदार सर्व प्रकारचे कार्ड पेमेंट स्वीकारू शकत नाही. व्हिसा कार्ड अनेक ठिकाणी काम करीत नाही आणि काही ठिकाणी मास्टर कार्ड काम करीत नाही. यामुळे केंद्रीय बँकेनं क्रेडिट कार्ड पेमेंटबाबत हा नियम बदलला आहे.
रुपे कार्डला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाचं पाऊल
क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डाबाबतचे नियम बदलले तर त्याचा सर्वाधिक सकारात्मक परिणाम रुपे कार्डवर दिसून येईल. देशात रुपे कार्डाला चालना देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक हा निर्णय घेत असल्याचे मानले जात आहे. अमेरिकन व्हिसा आणि मास्टरकार्डवर सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. परंतु त्यांच्या कार्ड नेटवर्कमध्ये RuPay कार्ड एंट्री नाही.