महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – पुणे – विशेष प्रतिनिधी – ओमप्रकाश भांगे – देशातील पेट्रोलियम कंपन्यांनी सलग नवव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. मागील आठवड्यात रविवारी लॉकडाउनमध्ये शिथिलता आणल्यानंतर पहिल्यांदा पेट्रोलियम कंपन्यांनी दरवाढ केली होती. दरम्यान, आज पेट्रोलच्या दरात ४८ पैशांची, तर डिझेलच्या दरात ५९ पैशांची वाढ करण्यात आली. त्याननंतर मुंबईत पेट्रोलचे दर ८३ रूपयांच्या पुढे गेले आहेत. यापूर्वी रविवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे ६२ पैसे आणि ६४ पैशांची वाढ करण्यात आली होती.
Petrol and diesel prices at Rs 76.26/litre (increase by Rs 0.48) and Rs 74.62/litre ((increase by Rs 0.59), respectively in Delhi. pic.twitter.com/QukjNkRMRW
— ANI (@ANI) June 15, 2020
सोमवारी पेट्रोलियम कंपन्यांनी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली. यानंतर दिल्लीत पेट्रोलचे दर ७६.२६ रूपये प्रती लीटर तर डिझेलचे दर ७४.६२ रूपये प्रती लीटर इतके झाले आहेत. तर मुंबईतही पेट्रोलचे दर ८३.१७ रूपये प्रती लीटर आणि डिझेलचे दर ७३.२१ रूपये प्रती लीटरवर पोहोचले आहेत. तर चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे ७९.९६ रूपये प्रती लीटर आणि ७२.६९ रूपये, तर कोलकात्यातही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होऊन ते अनुक्रमे ७८.१० रूपये प्रती लीटर आणि ७०.३३ रूपये प्रती लीटरवर पोहोचले आहेत.
दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल करण्यात येतो. तसंच सकाळी सहा वाजल्यापासूनच हे नवे दर लागूही करण्यात येतात. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात एक्साइज ड्युटी, डिलर कमीशन आणि अन्य बाबींचा समावेश केल्यानंतर याचे दर जवळपास दुप्पट होतात.