सलग चौथ्या दिवशी राज्यात तीन हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – पुणे – विशेष प्रतिनिधी – ओमप्रकाश भांगे – ता. १५- सलग चौथ्या दिवशी राज्यात तीन हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढून १ लाख ७ हजार ९५८ वर पोहोचली आहे. दिवसभरात १,६३२ रुग्णांना सुटी देण्यात आली असून, ५३ हजार १७ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील आकडेवारीची ट्विट करून माहिती दिली. राज्यात रविवारी ३,३९० जणांना करोना झाल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांचा आकडा १ लाख ७ हजार ९५८ इतका झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात १,६३२ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत ५०,९७८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ५३ हजार १७ इतकी आहे.
चार दिवसांपासून आलेख वाढता

राज्यात ९ जून रोजी दिवसभरात २,२५९ इतके रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर राज्यातील रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं. १० जून रोजी राज्यात एका दिवसात ३,२५४ बाधित रुग्ण आढळून आले. ३ हजारांच्या सरासरीतच रुग्ण आढळन येत आहेत. ११ जून रोजी ३,६०७ रुग्ण आढळून आले होते. १२ जून रोजी ३,४९३ रुग्ण आढळून आले, तर १३ जून रोजी ३,४२७ रुग्ण आढळून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *