Weather Update : आज पुण्यासह या 5 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ जुलै । आज पुण्यासह राज्यातील 5 जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. ठाणे, सातारा सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे, यासोबतच गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्येही आज पावसाची शक्यता आहे. मुंबईमध्ये मात्र आज पावसाचा जोर अतिशय कमी पाहायला मिळेल, राज्यातील इतर भागांमध्ये पाऊस आज दडी मारण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे . कोकणातही जोरदार पाऊस सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *