महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ जुलै । रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी सरकारने आज एक चांगली बातमी दिली आहे. वंदे भारतसह सर्व गाड्यांचे एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह क्लास आणि विस्टाडोम कोचचे भाडे २५ टक्क्यांपर्यंत कमी केले जाणार आहे, अशी माहिती रेल्वे बोर्डाने एका आदेशात दिली आहे. ट्रेनमध्ये जास्तीत जास्त जागांचं आरक्षण व्हावे, यासाठी भाड्यात ही कपात केली जाणार असल्याचे रेल्वेने सांगितले. याशिवाय भाडेदेखील वाहतुकीच्या स्पर्धात्मक पद्धतींवर अवलंबून राहणार आहे. (Rail travel will now be cheaper up to 25 percent reduction in AC chair car and executive class fares)
रेल्वेचा नेमका आदेश काय?
गेल्या ३० दिवसांत ज्या गाड्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी जागा आरक्षित आहे, अशा गाड्यांमध्ये सवलत देण्याची प्रक्रिया सुरू करण्यास रेल्वे बोर्डाने रेल्वेच्या विविध झोनला सांगितले आहे.
बऱ्याच दिवसांपासून होती मागणी
गेल्या अनेक दिवसांपासून भाडे कमी करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात होती. त्यासाठीच भारतीय रेल्वे तिकिटांच्या किमती कमी करण्यासाठी आणि प्रवाशांसाठी अधिक व्यवहार्य प्रवास बनवण्यासाठी कमी प्रवासी असलेल्या काही कमी अंतराच्या वंदे भारत यांसारख्या ट्रेनच्या भाड्यांचा आढावा घेत आहे.
Ministry of Railways introduces discount scheme in AC Chair Car and Executive Classes of all trains having AC Sitting Accommodation including Anubhuti & Vistadome Coaches. The element of discount shall be upto maximum 25% on the basic fare. Other charges like reservation charge,…
— ANI (@ANI) July 8, 2023
मूळ भाड्यात सवलत मिळणार
मूळ भाड्यावर जास्तीत जास्त २५ टक्के सूट मिळणार आहे, असंही रेल्वे बोर्डाने सांगितले. तसेच आरक्षण शुल्क, सुपर फास्ट अधिभार, जीएसटी इत्यादी इतर शुल्क सध्याच्या प्रमाणेच आकारले जाणार आहे. ही शिथिलता तातडीने लागू करण्यात येणार असल्याचे रेल्वे बोर्डाने सांगितले असले तरी आधीच बुक केलेल्या प्रवाशांना भाड्याचा परतावा दिला जाणार नाही. प्रवासाच्या पहिल्या किंवा शेवटच्या टप्प्यासाठी, मध्यवर्ती स्टेशन्ससाठी किंवा सुरुवातीपासून शेवटपर्यंतच्या प्रवासासाठी सवलत दिली जाऊ शकते, जर त्या टप्पा/स्टेशन/सुरुवातीपासून शेवटच्या प्रवासादरम्यान जागा ५० टक्क्यांपेक्षा कमी आरक्षित असतील.