महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – पिंपरी चिंचवड – विशेष प्रतिनिधी – पी.के.महाजन – या विश्वात मानव प्राणी परिपूर्ण नाही हे कोरोना महामारीु मूळे पुन्हा सिद्ध झाले आहे………. मानव प्राणी किती ही बलवान झाला, धनवान झाला, कितीही अणुबाँब तयार केले, मानव चंद्रावर जरी जावून आलाय तरीही माणुस अजून अपूर्ण च आहे. अमेरिका, जपान, इंग्लंड , स्पेन, चीन इ. मि मी म्हणणारे बलाढ्य देश ढिले पडलेत. कोरोनाना ने पार सर्वांचीच मस्ती जिरवली आहे… त्या मुळे आपण (माणसांनी ) आत्ता तरी एकमेकांची जिरवण्याच्या भानगडीत पडू नये. आपणं एखाद्या ची जिरवली तर आपली कोणीतरी जिरवतो. म्हणुन वास्तव स्वीकारले पाहीजे जे स्वीकारायलाच कठीण जातंय.
विश्वात आपण सर्व समान आहोत असे अनेक थोर पुरूषांनी म्हटले आहे परंतु मानव प्राणी ते मानायलाच तयार नाही. कोणी म्हणतो मी उच्च जातीचा आहे, कोणी म्हणतो मी श्रीमंत जहागिर दार आहे, कोणी म्हणतो मी मंत्री आहे, कोणी म्हणतो माझी लयी वट आहे…….असेल… कोरोना म्हणतो असेल… जगायचं ना? तर गुपचुप घरी रहा…..माणसा माणसा मध्ये…उच्च-निच, गरीब- श्रीमंत, ज्ञानी- अज्ञानी, गोरे-काळे…. असे माणनारयांना कोरोना ना ने सुतासारख सरळ केले आहे. सर्वांना कळून चुकले की आपण सर्व समान आहोत सर्वांना मास्क लावावाच लागत आहे.सर्वांना लाॅकडावुन व्हावे लागले.
आपल्या मध्ये कोणीही एक उच्च नाही, कोणीही एक श्रीमंत नाही कोणीही एक ज्ञानी नाही, या जगात आपल्या सारखे अनेक आहेत. आपली उंची, आपली हुशारी व आपली श्रीमंती सर्व ठिकाणावर राहीली आहे काहीच उपयोगात येत नाहिये. बुद्धी असुन डोकं चालत नाही, श्रीमंती असुन पैसा कामाचा नाही, गोरे असुन उपयोग नाही कारण कोरोना ला काही देणं घेणं नाही तुम्ही गोरे काय आणि काळे काय, ताकदवान असुन उपयोग नाही कारण शत्रू अदृश्य आहे त्या मुळे ताकद असुना दाखवता येत नाही……कस कोरोना म्हणल तस……सर्वांना लाॅकडावुन व्हावे लागले. सर्वांना कापडाचा च मास्क घालायला लावलंय कोरोना ने, कारण सोन्या चांदीचा चा मास्क घातला तर लवकर मरणार,.. दोन हजारांच्या नोटांचा मास्क घातला तरी लवकरच मरणार ……जात – धर्म- वर्ण सर्वच ठिकाणावर……माझी जात उच्च, माझा धर्म श्रेष्ठ….. सर्वांचा उपयोग शुन्य… ..कोरोना ने खर करुन दाखवलंय की…..”खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे”… एवढच काय तर “अस्पृश्यता” म्हणजे काय असते हे कोरोना ने समजवल. एखाद्या ला कोरोना झाला आहे तर त्याच्या पासून आपल्यालाही कोरोना होऊ नये म्हणजे त्याच्या बरोबर आपणही मरू म्हणून त्याच्या पासून लांब पळण्यात काही तरी तथ्य वाटते.
परंतु एखाद्या माणसाला काही ही झाले ल नसतांना त्याच्या पासून आपलयाला काहीही शारीरिक इजा होणार नाही हे ठाउक असूनही त्याला स्पर्श करु नकोस अस म्हटल तर त्याला काय वाटत असेल, हे अधोरेखित झाले आहे. माणूस किती विचीत्र प्राणी आहे हे कोरोना ने शिकवले. एक वेळ कोरोना झाल्या मुळे असपृशता हे आपण समजू शकतो. त्याच्या त वाईट वाटण्या सारख काहीच नाही पण काहीही झाले ल नसतांना व काही ही दोष नसतांना असपृशता पाळण म्हणजे नक्की काय अर्थ आहे तेच कळत नाही. अशी कशी विचार सरणी असावी ती ही वर्षानुवर्षे चालत आलेली होती……असो आज असपृशता प्रत्यक्षात नाहीये हिच एक मोठी सुधारणा माणसा मध्ये झाली आहे……
परंतु आजही काही बुद्धी ला न पटणारी अशा घटना घडत आहेत जी कोरोना च्या कालावधीत घडत आहेत समाजात जी माणुसकी ला धरून नाहीत. उदा: (1) सोसायटीतील एक नर्स कोरोना रुग्णालयात कोरोना बाधीतां साठी काम करते म्हणुन सोसायटीतील इतर सभासद तीला हिणवतात, तीला सोसायटीत राहु नको म्हणतात , (2) पोलिस बांधव कोरोना महामारी साठी नोकरी करतात, त्यांना एक लहान मुलगी आहे . ते कोरोना महामारी साठी नोकरी करतात म्हणून सोसायटीतील इतर सभासद त्यांच्या मुलांना त्या पोलीसां च्या मुली बरोबर खेळु देत नाहीत….अशा अनेक घटना असपृशता सारख्या घडत आहेत… किती खालची विचार सरणी आहे….. मरन येवू नये म्हणुन कोरोना बाधीत माणसा पासून माणूस कसा लांब पळ काढतो. कारण कोणतीही असो माणसाने माणसाला कमी लेखले तर त्या वेदना काय असतात याचे अनुभव या आजाराच्या साथीमूळे बघायला मिळत आहेत…… या पुढे तरी माणसात सुधारणा होईल अशी अपेक्षा करु या……… श्री. पि.के. महाजन.