महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ जुलै । आपल्यापैकी अनेकजणांना घर स्वच्छ ठेवायला आवडते. झाडू लावणे, फरशी पुसणे, किचन स्वच्छ ठेवणे, इत्यादी. आपल्या दैनंदिन स्वच्छतेचा भाग आहे. इतर गोष्टींच्या तुलनेत आपण बाथरुम मात्र दररोज नाही तर आठवड्यातून एकदा किंवा दोनदा स्वच्छ करतो त्यामुळे अनेकदा बाथरुमच्या टाइल्सवर पिवळटपणा दिसून येतो पण हेल्दी लाइफस्टाइलसाठी बाथरुमची स्वच्छताही तितकीच महत्त्वाची आहे. आज आम्ही तुम्हाला अगदी कमी पैशांमध्ये बाथरुमचा पिवळटपणा कसा दूर करायचा याविषयी सांगणार आहोत.
बाथरुमच्या टाइल्स स्वच्छ करण्यासाठी तुम्ही कोणताही दहा रुपयांचा साधारण साबण विकत आणा. या साबणाचे बारीक बारीक तुकडे करावेत. हे तुकडे एका बॉटलमध्ये पाणी टाकून मिक्स करावे. जेव्हा साबणाचे तुकडे पाण्यात विरघळेल तेव्हा हे साबणाचे लिक्विट टाइल्सवर टाकावे आणि स्क्रबरनी चांगल्याने घासावे. या सोपी उपायाने टाइल्सचा पिवळटपणा दूर होणार.
टाइल्स स्वच्छ करण्यासाठी तुम्ही दहा रुपयाच्या व्हिनेगरचाही वापर करू शकता. यासाठी व्हिनेगरला गरम पाण्यात मिक्स करावे. हे पाणी टाइल्सवर टाकून स्क्रबनी घासावे. ही ट्रिक वापरल्याने टाइल्स नव्यासारखी दिसेल.
जर टाइल्सवर खूप जास्त चिकटपणा किंवा अस्वच्छता असेल तर मीठाचा उपयोग करणे फायदेशीर ठरेल. बाथरुम स्वच्छ करण्याच्या आदल्या रात्री बाथरुमध्ये मीठ टाकावे आणि रात्रभर ठेवावे. दुसऱ्या दिवशी सकाळी स्क्रबरनी टाइल्स चांगल्या घासाव्यात. या बेस्ट ट्रिकने टाइल्सचा पिवळटपणा दूर होणार.