महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ जुलै । राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना आज सकाळी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यापाठोपाठ अजित पवार गटातील आणखी एका आमदारा धमकीचा फोन आला आहे. मंत्री धनंजय मुंडे यांनाही धमकीचा फोन आला आहे. धनंजय मुंडे यांच्या परळीच्या घरी धमकीचा फोन आल्याची माहिती आहे. या फोनवरून मुंडे यांना धमकी देण्याबरोबरच पैशांचीही मागणी करण्यात आली आहे. 50 लाख रूपयांची मागणी या फोनवरून करण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांना धमकीचा फोन आल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आज सकाळपासून राज्याच्या राजकारणात धमकीच्या फोनचीच चर्चा होतेय.