‘मेड इन इंडिया’ स्वस्त इलेक्ट्रिक मोटरसायकलची डिलिव्हरी सुरू

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ जुलै । Oben starts deliveries of Rorr e-motorcycle in Bengaluru: इलेक्ट्रिक टू-व्हीलर बनवणारी बेंगळुरू स्थित स्टार्ट-अप कंपनी ओबेन इलेक्ट्रिकने आपल्या ईव्हीची डिलिव्हरी सुरू केली आहे. कंपनीने इलेक्ट्रिक ओबेन रॉर बाइकचे पहिले २५ युनिट वितरित केले. ओबेन इलेक्ट्रिकने या रविवारी बंगलोरमधील जिगानी प्लांटमध्ये एका कार्यक्रमाचे (F2R-फर्स्ट टू रोअर) आयोजन केले. कार्यक्रमादरम्यान, कंपनीने ओबेन रोर ईव्हीची पहिली बॅच खरेदीदारांना दिली.

ओबेन इलेक्ट्रिकने बेंगळुरू येथील एका कार्यक्रमात आपल्या पहिल्या २५ ग्राहकांना नवीन ओबेन रॉर बाइक्स सुपूर्द केल्या. कंपनीची ही इलेक्ट्रिक बाईक केवळ ३ सेकंदात ० ते ४० किलोमीटरचा वेग पकडण्यास सक्षम आहे. कंपनी आपल्या ग्राहकांना या ईव्हीवर पहिल्या वर्षी ३ मोफत सेवा देते, यासोबतच ५०,००० किमी प्रति ३ वर्षांची वॉरंटी ५ वर्षांसाठी ७५,००० किमीपर्यंत वाढवता येते. कंपनी आपल्या ग्राहकांना रस्त्याच्या कडेला मोफत सहाय्य देत आहे आणि बाईक चार्ज करण्यासाठी देशभरात १२,००० पेक्षा जास्त चार्जिंग स्टेशन देखील प्रदान करत आहे.

ही बाईक फक्त २ तासात पुर्ण चार्ज होईल. oben rorr ही बाइक फुल चार्ज झाल्यावर तब्बल १८७ किलोमीटरचं अंतर गाठू शकते. ओबेन रोर इलेक्ट्रिक बाईकची विक्री या वर्षी मे महिन्यात बेंगळुरूमध्ये सुरू करण्यात आली होती. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ओबेन रॉर ईव्हीच्या विक्रीच्या प्रमुख घटकांमध्ये १५०cc पेट्रोल बाईकपेक्षा चांगली कामगिरी, ईव्हीची नवीन-युगाची रचना आणि त्यात दिलेली स्मार्ट वैशिष्ट्ये यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *