DCM अजित पवार मोठ्या बंधूंच्या घरी, तर त्यांचे पुतणे शरद पवारांच्या भेटीसाठी वाय बी चव्हाण सेंटरमध्ये

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ जुलै । राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर पवार कुटुंबीयांमध्ये तणावाचे वातावरण आहे. अजित पवारांसह पक्षाच्या 8 बडे नेते शरद पवारांविरोधात भूमिका घेत थेट शिंदे – फडणवीस सरकारमध्ये सहभागी झालेत. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे पुतणे तथा श्रीनिवास पवार यांचे सुपुत्र युगेंद्र पवार शरद पवारांच्या भेटीसाठी वाय बी सेंटरमध्ये गेलेत. तर दुसरीकडे, अजित पवार श्रीनिवास पवारांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी गेल्याची माहिती समोर आली आहे. श्रीनिवास पवार हे अजित पवार यांचे सख्के मोठे बंधू आहेत. त्यामुळे पवार कुटुंबीयांतील मतभेदांवर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

सद्यस्थितीत अजित पवार व शरद पवार यांचे राजकीय मार्ग वेगळे झालेत. अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांसह शिंदे – फडवीस सरकारला पाठिंबा दिला. त्यानंतर अजित पवार स्वतः उपमुख्यमंत्री झाले, तर त्यांच्या समर्थक 8 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या घटनेला 8 दिवस लोटलेत. या काळात शरद व अजित पवार यांनी एकमेकांवर तिखट टीका केली. त्यातच आता या भेटीगाठी सुरू झाल्या आहेत.

दोन्ही भेटींच्या टायमिंगची चर्चा

2019 मध्ये अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी केला होता. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी अजित पवारांची मनधरणी करून त्यांना स्वगृही परत आणले होते. सध्या तशी स्थिती नाही. पण अजित पवार आपले मोठे बंधू श्रीनिवास पवार यांच्या भेटीला जातात अन् त्याचवेळी त्यांचे पुत्र युगेंद्र पवार शरद पवारांच्या भेटीसाठी वाय बी चव्हाण सेंटरमध्ये पोहोचतात. यामुळे या भेटीच्या टायमिंगमुळे पाहता कुटुंबामध्ये काही बोलणी किंवा चर्चा सुरु आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

..तेव्हा श्रीनिवास पवारांनी बजावली होती महत्त्वाची भूमिका

विशेष म्हणजे 2019 मधील पहाटेच्या शपथविधी वेळीही अजित पवार श्रीनिवास पवार यांच्या निवासस्थानी होते. तिथेच त्यांच्या मनधरणी केली जात होती. श्रीनिवास पवार यांच्याच माध्यमातून अजित पवार यांच्याशी संपर्क झाला होता. अजित पवार यांनी वेगळा मार्ग स्वीकारल्यानंतर शरद पवार व अजित पवार यांच्यातील संबंध बिघडले आहेत. त्याचवेळी या भेटीगाठी होत आहेत. त्यामुळे राजकीय मतभेद असले तरी कौटुंबिक नाते तसेच राहावे यासाठी कुटुंबीयांकडून हालचाली होत असल्याची चर्चा सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *